शहादा पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 12:56 PM2019-07-07T12:56:45+5:302019-07-07T12:56:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सोशल मेडियाचा वापर संयमाने व चांगल्या गोष्टींसाठी वापरा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : सोशल मेडियाचा वापर संयमाने व चांगल्या गोष्टींसाठी वापरा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी येथे शांतता कमिटीच्या बैठकीत केले.
शहादा पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. शहादा शहर हे जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी आहे असे सांगून संजय पाटील यांनी शहरात शांतता कायम रहाण्यासाठी सर्वानी सावध राहणे आवश्यक आहे. सोशल मिडियाचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला असून प्रत्येकाने सोशल मिडियाचा वापर करताना काळजी घेतली पाहिजे. चुकीच्या मेसेजमुळे गैरसमज पसरुन शांतता धोक्यात येऊ शकते म्हणून प्रत्येकाने सोशल मिडियाचा वापर संयमाने व जबाबदारीने करावा. बैठकीस नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, अरविंद कुंवर, शशिकांत कुंवर, सुनील गायकवाड, सुपडू खेडकर, प्रा.एल.एस. सैयद, अनिल भामरे, खलील शहा आदी उपस्थित होते.