कचरा टाकणा_यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:40 AM2018-12-21T11:40:53+5:302018-12-21T11:40:57+5:30

तळोदा : पालिका प्रशासनाकडून व्यावसायिकांनाही तंबी

Penal action on garbage collection | कचरा टाकणा_यांवर दंडात्मक कारवाई

कचरा टाकणा_यांवर दंडात्मक कारवाई

Next

तळोदा : सुचना देऊनही वारंवार रस्त्यावर कचरा टाकणा:या व्यावसायिक तसेच लॉरीधारकांना पालिका प्रशासनाकडून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्याची तंबी देण्यात आली आह़े पालिका अधिका:यांकडून प्रत्यक्ष व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानांवर जावून संबंधितांना समज देण्यात आली आह़े
दरम्यान, सुंदर व स्वच्छ शहर राखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येत आह़े रस्त्यावर कचरा फेकल्याबाबत पालिकेने ठोस कार्यवाही सुरु केल्याने शहरवासीयांनी समाधान व्यकत केले आह़े शहरातील स्वच्छतेबाबत पालिकेने सकारात्मक भूमिका घेतली आह़े त्यामुळे पालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी घंटागाडय़ा खरेदी करुन या गाडय़ांव्दारे दररोज कचरा संकलन केले जात असत़े त्याच बरोबर ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी कचरा पेटय़ादेखील वाटप करण्यात आल्या आहेत़ या शिवाय गटारींची स्वच्छताही केली जात आह़े असे असतांनाही शहरातील व्यावसायिक नेहमी सायंकाळच्या सुमारास आपली प्रतिष्ठाने बंद केल्यानंतर कचरा रस्त्यावर फेकत असतात़ त्यातही भाजीपाला व्यावसायिक उरलेला सडका भाजीपाला रस्त्यावर फेकतात़ त्यामुळे साहजिकच अस्वच्छतेत भर पडत असत़े वास्तविक या व्यावसायिकांना असा कचरा आणि भाजीपाला रस्त्यावर फेकल्याबाबत वारंवार पालिकेच्या स्वच्छता विभागाने सूचना दिल्या आहेत़ असे असताना पालिकेच्या या सूचनांना धाब्यावर बसवत हे व्यावसायिक सर्व कचरा रस्त्यावर फेकत असतात़ त्यामुळे पालिकेचे नगराध्यक्ष अजय परदेशी, अनुप उदासी, मुख्याधिकारी जनार्दन पवार, स्वच्छता विभागाचे प्रमुख राजेंद्र माळी, यांनी बुधवारी सायंकाळी शहरातील मेनरोड, स्मारक चौक, भाजीपाला मार्केट, बसस्थानक रोड, तहसील रोड अशा संपूर्ण परिसरातील व्यावसायिकांना प्रत्यक्ष भेटून रस्त्यावर कचरा न टाकण्याची तंबी दिली़ विशेषत: भाजीपाला व्यावसायिकांवर अधिक जोर दिला़ घंटागाडीत कचरा न टाकल्याने शहर स्वच्छ ठेवण्यास बाधा येत असत़े
 स्वच्छता राखण्याची सर्वाची जबाबदारी आह़े सूचनांचे पालन न केल्यास एक हजारांपासून ते पाच हजारांर्पयत दंडाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आल़े या वेळी त्यांनी स्वच्छालये, गटारी, स्वच्छतागृह, यांचीही पाहणी          केली़
दरम्यान रस्त्यावर बसणा:या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबतही पालिकेने अशीच कारवाई करावी अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येत आह़े 
 

Web Title: Penal action on garbage collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.