मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणाऱ्यांना पावणेदोन लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:12 PM2020-07-16T12:12:32+5:302020-07-16T12:12:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : मास्क वापरणारे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे यासारख्या नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यांविरोधात तळोदा पोलिसांनी कारवाईचा बडगा ...

Penalties of Rs 2.5 lakh for non-compliance with masks and social distance rules | मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणाऱ्यांना पावणेदोन लाखांचा दंड

मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणाऱ्यांना पावणेदोन लाखांचा दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : मास्क वापरणारे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे यासारख्या नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यांविरोधात तळोदा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत मागील १३ दिवसात एक लाख ८१ रूपयांचा दंड वसूल केला आहे. पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाºयांविरोधात दंड वसुलीवर भर दिला असताना नागरिकामध्ये मात्र स्वयंशिस्तीचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.
मागील आठवड्यापासून नंदुरबार जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील तीन महिन्यापासून कोरोना रूग्ण नसणाºया शहरातदेखील कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १७ पर्यत गेली होती. यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे होते. त्यामुळे प्रशासनाकडून विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध अधिक कडक करण्यात आहेत. या निर्बंधाचे उल्लंघन करणाºयाकडून जिल्हाधिकाºयांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाºयावर तळोदा पोलिसांकडून मागील १५ दिवसापासून दररोज कारवाई करण्यात येत आहे.
१ ते १३ जुलैच्या दरम्यान मास्क न वापरणाºया १२५ जणांवर केलेल्या कारवाईतून तब्बल एक लाख २५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे तर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºया ११२ जणांवरदेखील कारवाई करून ५६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुकणाºया दोन जणांवर ४ जुलै रोजी कार्यवाही करून त्यांच्याकडून ५०० ते एक हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. १ जुलै ते १३ जुलै दरम्यान सुमारे २४० जणांवर कारवाई करून पोलिसांनी आतापर्यंत एकूण एक लाख ८१ हजार रूपयांचा दंड नियमांचे पालन न करणाºया बेशिस्त नागरिकांकडून वसूल करण्यात आला आहे. याशिवाय नियमांचे उल्लंघन करून वेळ न पाळून बिनदिक्कतपणे दुकाने सुरू ठेवण्याºयांवरेदेखील पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून कारवाई करून दंड वसूल केल्याची आकडेवारी पाहता पोलिसांकडून दंड वसुलीवर भर दिले असल्याचे सांगितले जात आहे. तळोदा शहरात कोरोनाचा एकही रूग्ण नव्हता तेव्हा नागरिकांनी शिस्तीचे दर्शन घडविले. शहरात ठिकठिकाणी गर्दी जमून फिजीकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडालेला दिसून आला. मुख्य बाजारपेठेतदेखील मेनरोड व स्मारक चौकात प्रचंड वाहतूक कोंडी अनुभवायला मिळत आहे. अनेकांकडून नियमांचे उल्लंघण होत असून, त्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

Web Title: Penalties of Rs 2.5 lakh for non-compliance with masks and social distance rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.