मयतासोबत संपर्कातील लोकांनी तपासणीसाठी पुढे या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 12:56 PM2020-04-24T12:56:10+5:302020-04-24T12:56:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आह़े या पाश्र्वभूमीवर मयताच्या संपर्कात आलेल्या गावांमध्ये प्रशासनाने तपास ...

People in contact with Mayata should come forward for investigation | मयतासोबत संपर्कातील लोकांनी तपासणीसाठी पुढे या

मयतासोबत संपर्कातील लोकांनी तपासणीसाठी पुढे या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आह़े या पाश्र्वभूमीवर मयताच्या संपर्कात आलेल्या गावांमध्ये प्रशासनाने तपास सुरु केला असून ही गावे अलर्ट झाली आहेत़ सर्वच गावांमधून ग्रामस्थ पुढे येत असून अद्याप कोणातही कोरोनाची लक्षणे आढळलेली नसल्याची माहिती आह़े 
शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील एकाच कुटुंबातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल  समोर आला होता़ यानंतर दोघांना तातडीने नंदुरबार येथील जिल्हा रूग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले होते. यातील 31 वर्षीय पॉझीटिव्ह रूग्णाचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान हा रूग्ण व्यापारी असल्याने त्याचा तालुक्यातील 16 खेडय़ातील शेतक:यांशी संपर्क आल्याचे प्रशासनाने जाहीर केल्यानंतर संबंधित गावांमधील व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना प्रशासनातर्फे तपासणीचे आवाहन करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या आवाहानाला प्रतिसाद देण्यात येत आह़े 
 मयत झालेला कोरोनाबाधित रुग्ण तालुक्यातील काही शेतक:यांकडे फळ पिकांच्या खरेदीसाठी संपर्कात होता. त्यामुळे म्हसावद, जयनगर, मोहिदे, पाडळदे, औरंगपूर, कहाटुळ, ब्राrाणपुरी, मानमोडय़ा, फत्तेपुर, अंबापूर,  गोगापुर, डामरखेडा, शिरूडदिगर, रायखेड, लोणखेडा, आमोदा, चांदसैली आदी गावातील ज्या नागरिकांशी संबंधित रूग्णाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या संबंध आला असेल त्यांनी काही त्रास जाणवत असल्यास स्वत:हून प्रशासनास कळवून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित गावातील ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका, आशावर्कर यांच्यामार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. दरम्यान काही गावातील शेतक:यांनी स्वत:हून तपासणी करून घेऊन होम क्वॉरंटाईन झाले आहेत. 

Web Title: People in contact with Mayata should come forward for investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.