तळोद्यात कीडनाशक फवारणीला आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:39 PM2018-01-14T12:39:51+5:302018-01-14T12:39:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानामुळे रब्बीला फटका बसत आह़े कीटकांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतक:यांकडून किटकनाशकांची फवारणी करण्यात येत आह़े
गेल्या काही दिवसांपासून तळोद्यात मोठय़ा प्रमाणात ढगाळ हवामान आह़े त्यामुळे रब्बीतील हरभरा तसेच इतरही पिकांची वाढ खुंटली आह़े ढगाळ हवामानामुळे हरभरा पिकावर पान कुरतळणा:या अळीचा प्रादुर्भाव झाला आह़े यामुळे हरभरा पिक प्रभावीत होत आह़े त्याच प्रमाणे गुजरात राज्याच्या सिमेलगत असलेल्या बालदा, बहुरुपा, अंतुर्ली, वाका, चाररस्ता परिसरात मोठय़ा प्रमाणात हरभरा पिक घेण्यात आले आह़े परंतु या ठिकाणी ढगाळ हवामानामुळे कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आह़े या ठिकाणी काही दिवसांपासून ढगाळ हवामान आह़े त्यामुळे पिकांना पाहिजे त्या प्रमाणात सूर्यप्रकाश मिळत नसल्याने पिकांची वाढही खुंटली आह़े पिकांवर संधीसाधू किडरोगांचाही प्रादुर्भाव होत आह़े़ या अळ्या हरभरा पिकाच्या पाने कुरतळत असून यामुळे पिकांच्या दर्जावरही परिणाम होत असतो़ वाढही खुंटत असल्याने शेतक:यांचे आर्थिक नुकसानदेखील मोठय़ा प्रमाणात होत आह़े शेतक:यांकडून हरभरा पिकावर बुरशीनाशकांची फवारणी करण्यासाठीच अधिकचा खर्च होत असल्याचे सांगण्यात येत आह़े