पेट्रोलच्या भडक्यात ‘माजिर्न’चा चटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:55 PM2018-05-29T12:55:06+5:302018-05-29T12:55:06+5:30
काळाबाजार : गुजरातेतील पेट्रोल सिमावर्ती गावांमध्ये 100 रुपये लीटर
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 29 : एकीकडे नंदुरबारसह संपूर्ण राज्यात पेट्रोल, डिङोलच्या दरवाढीचा भडका उडाला आह़े तर दुसरकडे नंदुरबार व गुजरात राज्यातील सीमावर्ती भागातील नागरिकांना पेट्रोल विक्रीच्या काळ्या बाजारात माजिर्नचा चटका सहन करावा लागत आह़े पेट्रोलमाफिया गुजरातेतील स्वस्त दरात मिळणारे पेट्रोल महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर तब्बल 100 रुपये लीटरप्रमाणे विक्री करीत आहेत़ त्यातून त्यांना साधारणत 10 रुपयांचे ‘माजिर्न’ मिळत आह़े
नंदुरबारात सध्या पेट्रोल, डिङोलचे दर गगनाला भिडले आहेत़ पेट्रोल 87 रुपये 17 पैसे तर, डिङोल 74 रुपये 74 रुपये 75 पैशांवर जाऊन पोहचले आह़े महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत गुजरातेत पेट्रोलच्या भावात साधारण 10 रुपयांची तफावत आह़े गुजरातेत पेट्रोल 77 रुपये 62 पैसे तर डिङोल 73 रुपये 12 पैसे दराने विकले जात आह़े महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातेत पेट्रोल स्वस्त आह़े त्यामुळे किरकोळ दुकानदार तसेच व्यावसायिकांकडून गुजरातेतील निझर येथून पेट्रोलचा साठा आणत नंदुरबारातील सीमावर्ती भागात तब्बल 100 रुपये लीटर दराने विकण्यात येत आह़े यातून त्यांना बक्कळ नफा मिळत असल्याचे त्याच्यांकडूनच सांगण्यात येत आह़े
कॅन भरून आणले जाते पेट्रोल
गुजरातेत पेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त असल्याने येथील किराणा दुकानदार तसेच इतर छोटय़ा-मोठय़ा व्यावसायिकांकडून थेट दुचाकी तसेच प्रवासी वाहनांव्दारे प्लॅस्टिकच्या कॅन भरून शेकडो लीटर पेट्रोल आणले जात असल्याचे दिसून येत आह़े अत्यंत धोकादायक पद्धतीने पेट्रोलची हाताळणी तसेच वाहतूक केली जात आह़े
नंदुरबारातील सीमावर्ती भागात पेट्रोलचा मोठा काळाबाजार करण्यात येत असल्याने याचा फटका सर्वसामान्य वाहनधारकांना बसत आह़े सीमावर्ती भागात पेट्रोलपंपाची संख्या कमी असल्याने परिणामी नंदुरबारच्या मध्यवर्ती भागात येण्याससुद्धा पेट्रोल लागत असत़े त्यामुळे वाहनधारकांकडून तेथीलच किराणा दुकानदारांकडून नाईलाजास्तव वाढीव दराने पेट्रोलची खरेदी केली जात आह़े
एक लीटर पेट्रोलमागे व्यावसायिकांना साधारणत 10 ते 11 रुपयांचा नफा मिळत असतो़ त्यामुळे तो नफा मिळवण्यासाठी त्यांच्याकडून वाहनधारकांची अशाप्रकारे फसवणूक करण्यात येत असत़े एकीकडे बाटली, कॅनमध्ये पेट्रोल देण्यास मनाई असतानासुद्धा बहुतेक पेट्रोलपंप चालकांकडून ग्राहकांना बिनदिक्कतपणे कॅनमध्ये पेट्रोल दिले जात आह़े
दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोलचे भाव वाढल्याने गुजरातेतील पेट्रोलची मागणी वाढली आह़े गेल्या 15 दिवसातच साधारणत 30 ते 40 टक्के इतक्या प्रचंड प्रमाणात गुजरातेतील पेट्रोलला मागणी वाढल्याचे पेट्रोल पंप चालकांकडून सांगण्यात येत आह़े असे असले तरी महाराष्ट्रातील वाहनधारकांची त्यात चांगलीच लूट होत आह़े