पुराच्या पाण्यात पाईपलाईन तुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:27 PM2019-08-11T12:27:11+5:302019-08-11T12:27:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणारी विरचक ते नंदुरबार दरम्यानची मुख्य पाईपलाईन पुराच्या पाण्यात तुटल्याने पाणी ...

Pipeline breaks down in flood waters | पुराच्या पाण्यात पाईपलाईन तुटली

पुराच्या पाण्यात पाईपलाईन तुटली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणारी विरचक ते नंदुरबार दरम्यानची मुख्य पाईपलाईन पुराच्या पाण्यात तुटल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. पाईप लाईन दुरूस्तीच्या कामाला दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोर्पयत पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे. 
शहराला विरचक प्रकल्पातून 70 टक्के भागात पाणी पुरवठा केला जातो. विरचक प्रकल्प ते नंदुरबार अशी मुख्य पाईपलाईन त्यासाठी टाकण्यात    आली आहे. टोकरतलाव   गावाजवळील नाल्याला लागून ही पाईपलाईन टाकण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे या नाल्याला पूर    आल्याने पुरात पाईप लाईन तुटली आहे. यामुळे  शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. या ठिकाणी वेगात पाणी वाहत असून ते थांबल्याशिवाय पाईपलाईन जोडणी होणे शक्य नाही. त्यासाठी किमान     दोन दिवस लागण्याची शक्यता      आहे.
पालिकेने आष्टे पंपींग स्टेशनवरून पाणी पुरवठय़ाचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. परंतु येथे विजेची समस्या असल्यामुळे व्यत्यय येत आहे. शिवाय केवळ 30 टक्के पाणी पुरवठय़ाची क्षमता या पंपींग स्टेशनची आहे. त्यामुळे पुर्ण शहराला पाणी पुरवठा करणे येथून शक्य नाही. परिणामी मंगळवार्पयत शहरातील पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक विस्कळीत राहणार आहे.
नागरिकांनी पाणी जपून वापरावे व पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा र}ा रघुवंशी, पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील यांनी केले आहे. 
पर्यायी व्यवस्थेची मागणी
जास्त दिवस पाणी पुरवठा ठप्प राहिल्यास पालिकेने वसाहतींमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा अशी मागणी होत आहे. शिवाय आष्टे पंपींग स्टेशनवरून होणारा पाणी पुरवठा झोनननुसार त्या त्या भागात करण्यासाठी पालिकेने नियोजन करावे अशीही मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.  
 

Web Title: Pipeline breaks down in flood waters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.