20 जुलैपासून नंदुरबारात सम-विषम पार्किगचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:41 PM2018-07-06T12:41:08+5:302018-07-06T12:41:14+5:30

पोलीस अधिक्षकांचे आदेश

Planning of equitable training in Nandurbar from July 20 | 20 जुलैपासून नंदुरबारात सम-विषम पार्किगचे नियोजन

20 जुलैपासून नंदुरबारात सम-विषम पार्किगचे नियोजन

Next

नंदुरबार : शहरातील अरूंद रस्त्यांवर नियमित होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी शहर वाहतूक शाखा प्रायोगिक तत्त्वावर सम-विषम पार्किग आणि एकेरी वाहतूक मार्ग सुरू करणार आह़े पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी काढलेल्या आदेशानुसार येत्या 20 जुलैपासून या उपाययोजनांची अंमलबजावणी होणार आह़े 
शहरात वाहनांची संख्या वाढली असली तरी रस्ते मात्र जुन्या धाटणीचे आहेत़ या रस्त्यांवरून ये-जा करण्यास वाहनांना अडचणी येत आहेत़ यातून वाहतूक कोंडीचे प्रकार सातत्याने वाढत आहेत़ शहरातील नगरपालिका चौक, मंगळबाजार, सुभाष चौक, अमृत चौक, घी बाजार, गांधी पुतळा, हाट-दरवाजा, गणपती मंदिर, जळका बाजार, शिवाजी चौक, माणिक चौक, सिंधी कॉलनी यासह इतर ठिकाणी वाहतूकीची कोंडी होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने याठिकाणी सम-विषम पार्किग आणि एकेरी मार्गाचा पर्याय वाहतूक शाखेने निवडला आह़े येत्या 20 जुलैपासून नियोजनानुसार कारवाई होणार असल्याचे कळवण्यात आले आह़े  शहरातील नेहरू पुतळा ते नगरपालिकेकडे जाणा:या रस्त्याची डावी बाजू, रोटरी वेलनेस सेंटर ते नवी पालिका शॉपिंग उजवी बाजू, नगरपालिका चौक ते बँक ऑफ बडोदा एटीएम उजवी बाजू, नवीन पालिका शॉपिंग दुकान क्रमांक 1 ते अंधारे चौक डावी बाजू, शास्त्री मार्केट परिसर डावी आणि उजवी बाजू, माणिक चौक परिसर, गांधी पुतळा ते हाटदरवाजा चौक या दरम्यान सम-विषम पार्किग होणार आह़े 
हाट-दरवाजा, गणपती मंदिर, माणिक चौककडून शास्त्री मार्केटकडे जाणा:या वाहनधारकांनी उजवीकडे वळण घेत शास्त्री मार्केटकडे न जाता सरळ मेडिकल दुकानाला वळसा घालून शास्त्री मार्केट मार्गाने नगरपालिकेकडे जाव़े 
गांधी पुतळा मार्गाने हाटदरवाजाकडून महाराष्ट्र व्यायामशाळा मार्गाने साक्रीनाका परिसरात जाणारी सर्व वाहने सोनार खुंंट मार्गाने जातील़ नवापूर चौफुलीकडून शहरात प्रवेश करणा:या चारचाकी वाहनांनी जळका बाजारातून शिवाजी चौक, दोशाह तकिया व देसाईपुरा मार्गाने शहरात प्रवेश करायचा आह़े सोनार खुंटार्पयत केवळ दुचाकी आणि तीनचाकी वाहने, तसेच शासकीय वाहने आणि रूग्णवाहिका यांनाच सूट देण्यात आल्याचे कळवण्यात आले आह़े या आदेशांचे उल्लंघन करणा:यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आह़े 
 

Web Title: Planning of equitable training in Nandurbar from July 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.