168 हेक्टर सामुहिक वनहक्क क्षेत्रात पावणेदोन लाख वृक्षांचे होणार रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:05 PM2019-07-10T12:05:53+5:302019-07-10T12:06:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामुहिक वनहक्क क्षेत्रावर पावणे दोन उपयुक्त रोपांची लागवड ...

Planting of 168 hectares of community waste will be done for paddy lone trees | 168 हेक्टर सामुहिक वनहक्क क्षेत्रात पावणेदोन लाख वृक्षांचे होणार रोपण

168 हेक्टर सामुहिक वनहक्क क्षेत्रात पावणेदोन लाख वृक्षांचे होणार रोपण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामुहिक वनहक्क क्षेत्रावर पावणे दोन उपयुक्त रोपांची लागवड करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून गती देण्यात आलेल्या या कामासाठी वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्याने वनहक्क जमिनी हरित होण्यास मदत मिळणार आह़े 
जिल्हा प्रशासन, ग्रामीण वन नियोजन समिती व लोकसमन्वयक प्रतिष्ठान यांच्यावतीने जिल्ह्यात हा उपक्रम राबवण्यात येत आह़े एक हेक्टर क्षेत्रात 1 हजार 111 याप्रमाणे सामाजिक वनीकरण विभाग 104 हेक्टरवर 1 लाख 15 हजार 544 तर वन विभाग 64 हेक्टर क्षेत्रात 62 हजार 216 रोपांची लागवड करणार आह़े यांतर्गत सामूहिक वनीकरण   विभाग नंदुरबार तालुक्यातील वाघाळे, अंबापुर, सुतारे, अजेपुर, अक्कलकुवा तालुक्यात सरी, दहेल, वालंबा, रोजकुंड, भराडीपादर, खाई, गुलीआंबा, भगदरी, कुंडी या 13 गावात 104 हेक्टरवर 1 लाख 15 हजार 544 वृक्षांची लागवड होणार आहे. शहादा वनविभाग बुरुमपाडा, तोरणमाळ, सिंधी, लेगापाणी, निगदी, कुंभरी या गावांमध्ये प्रत्येकी आठ हेक्टरप्रमाणे 48 हेक्टर क्षेत्रावर 53 हजार 328 तसेच मेवासी वनविभाग तळोदा यांच्याकडून अमोणी आणि मालदा या गावातील 16 हेक्टर क्षेत्रावर 17 हजार 776 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. लागवड होणारी ही झाडे आंबा, जांभुळ, चिंच, बोर, आवळा, सिताफळ, बेल, शेवगा, कवठ, खैर, बांबू, कडुनिंब, पेरु, आवळा ,वड, बेहडा यांची आहेत़ यामुळे त्यांच्यातून आदिवासी बांधवांना लाभच होणार आह़े 
सामूहिक वनहक्क क्षेत्रात लागवड होणा:या या झाडांसाठी रोहयोंतर्गत खड्डे खोदले गेल्याने त्या-त्या गावातील आदिवासींना रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती आह़े तब्बल 30 गावांनी या उपक्रमात सक्रीय सहभागी होत गाव हरित करण्याचा संकल्प केला आह़े वनविभाग, वनीकरण विभाग आणि लोकसमन्वयचे पदाधिकारी उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत़ 
 

Web Title: Planting of 168 hectares of community waste will be done for paddy lone trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.