प्लॅस्टीक बंदीबाबत नंदुरबार पालिकेकडून कारवाईचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:41 PM2018-03-25T12:41:27+5:302018-03-25T12:41:27+5:30
व्यावसायिकांकडून सहकार्य अपेक्षीत : पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्याची गरज
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 25 : राज्य शासनाकडून प्लॅस्टीक बनावटीच्या ठराविक वस्तूंवर बंदी घालण्यात आली आह़े परंतु तरीही संबंधित वस्तूंची कोणाकडून उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, विक्री करण्यात येत असल्यास दोषींवर नंदुरबार पालिका प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आह़े
पर्यावरणावर प्लॅस्टीकच्या अतीवापराने मोठय़ा प्रमाणात दुष्परिणाम होत आहेत़ त्याच प्रमाणे माणवासह, पशुंच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आह़े त्यामुळे राज्य शासनाकडून प्लॅस्टीकच्या वापराबाबत कठोर भूमिका घेण्यात येत आह़े
प्लॅस्टीक बनावटीपासून बनविल्या जाणा:या पिशव्या, तसेच प्लॅस्टीक बनावटीच्या वस्तू जसे की, ताट, कप्स्, प्लेटस्, ग्लास, वाटी चमचे आदी वस्तूंच्या वापरावर व विक्रीवर बंदी घालण्यात आली आह़े याबाबत राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाचा आदेशही पालिका प्रशासनाला सोमवारी मिळणे अपेक्षीत आह़े
दरम्यान, याआधीही महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा नियंत्रण कायदा 2006 मध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या व आठ बाय 12 इंच आकारपेक्षा कमी असलेल्या प्लॅस्टीक पिशव्यांवर बंदी घातली होती़ परंतु याची पाहिजे त्या प्रमाणात प्रभावी अंमलबजावणी झाली नाही़ दरम्यान, चौथा शनिवार व रविवार असे सलग दोन दिवस सुटी असल्याने सोमवारी पालिका प्रशासनाला शासनाचा प्लॅस्टीक बंदीबाबतचा अध्यादेश मिळणे अपेक्षीत आह़े दरम्यान, प्लॅस्टीक पिशव्यांना बंदी घालण्यात आली असली तरी त्याला पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देणे गरजेचे आह़े त्याशिवाय प्लॅस्टीकचा वापर कमी करणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आह़े नंदुरबारात दर दिवसाला शेकडो किलो प्लॅस्टीक कच:याची निर्मिती होत असत़े परंतु त्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याले यामुळे प्रचंड प्रमाणात प्रदुषणाची समस्या भेडसावत आह़े