वाहन उभे करण्यावरून पोलिसाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 12:08 PM2019-12-09T12:08:09+5:302019-12-09T12:08:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुचाकी रस्त्यावर उभी केल्याने रस्ता ओलांडता आला नाही म्हणून एकाने पोलिसाशी हुज्जत घालून मारहाण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुचाकी रस्त्यावर उभी केल्याने रस्ता ओलांडता आला नाही म्हणून एकाने पोलिसाशी हुज्जत घालून मारहाण केल्याप्रकरणी एकाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पेश भरत पाटील, रा. बाबा गणपतीजवळ, नंदुरबार असे संशयीताचे नाव आहे. उपनगर ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुनील राठोड हे पोलीस मुख्यालयात टपाल देवून परत पोलीस ठाण्यात जात होते. साक्रीनाका ते जळकाबाजार दरम्यान बाबा गणपतीजवळ दुचाकी आडवी लावण्यावरून कल्पेश सोनार यांनी सुनील राठोड यांच्याशी वाद घातला. त्यातून सोनार यांनी राठोड यांच्या पोलीस गणवेशाची कॉलर पकडून गालावर ठोसे मारले.
याबाबत राठोड यांनी उपनगर पोलीस ठाण्यात जावून अधिकाऱ्यांना हकीकत कथन केली. त्यानंतर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून कल्पेश सोनार यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणने आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक शेजवळ करीत आहे.