लहान शहादा येथे पोलिस निरिक्षकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 12:37 PM2020-04-18T12:37:19+5:302020-04-18T12:40:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गावातील वस्तीत अडविलेला रस्ता मोकळा केल्याच्या वादातून लहान शहादा येथे झालेल्या मारहाणीतील संशयीतांना ताब्यात ...

Police inspector gunned down at Chhota Shahada | लहान शहादा येथे पोलिस निरिक्षकास मारहाण

लहान शहादा येथे पोलिस निरिक्षकास मारहाण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गावातील वस्तीत अडविलेला रस्ता मोकळा केल्याच्या वादातून लहान शहादा येथे झालेल्या मारहाणीतील संशयीतांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या जमावाने सहायक पोलीस निरिक्षक व पोलीस पाटील यांना मारहाण केली. या प्रकरणी जमावाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणने, जमावबंदीचे उल्लंघन यासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे.  
अटक करण्यात आलेल्यांमध्ये हाडू जाण्या भिल, गणेश मालसिंग भिल, परसू मोतिराम भिल, वसंत लक्ष्मण भिल, मनेश हाडू भिल, अजरून धान्या भिल, अजय विजय भिल, सुकलाल उद्धव भिल, आत्माराम आनंद भिल, उत:या उद्धव भिल, फुलसिंग जाण्या भिल, पिंटू विजय ठाकरे, अंबालाल ताराचंद भिल यांचा त्यात समावेश आहे. 
पोलीस सूत्रांनुसार, लहान शहादा येथे बामळोद रस्त्यावरील वस्तीकडे जाणारा रस्ता काटे व दगड लावून बंद करण्यात आला होता. काही तरुणांनी तो रस्ता मोकळा करण्यासाठी काटे व दगड हटविले. त्याबाबत वस्तीतील लोकांनी विचारणा केल्यावर दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली. याबाबत तालुका पोलिसांना माहिती मिळाल्यावर सहायक पोलीस निरिक्षक अविनाश निवृत्ती केदार यांनी पथकासह धाव घेतली. 
जमावाला पांगवत असतांना काही युवकांनी व महिलांनी सहायक निरिक्षक केदार व पोलीस पाटील मुकेश राजाराम पाटील यांना मारहाण केल्याने ते जखमी झाले. लागलीच अतिरिक्त पोलीस फोर्स मागविण्यात आला. यावेळी जमावातील काहींनी पोलिसांनीच मारहाण केल्याचा बनाव रचून आपले कपडे फाडले.
याबाबत सहायक निरिक्षक अविनाश केदार यांनी फिर्याद दिल्याने  जमावातील हाडू जाण्या भिल, राहुल वळवी, गणेश भिल, निलेश भिल, उषाबाई भिल, गणेश भिल, गणेश संतू भिल, गणेश माल्या भिल, अनिल भिल, योगेश भिल, शेगा भिल, पिंटय़ा भिल, विजय भिल, लालू भिल, सूरज भिल, परसू भिल, दिनेश भिल, राकेश भिल, सुनील भिल, वसंत भिल, रमिला भिल, भागाबाई भिल, मनेश भिल, रवीन भिल, सुपडय़ा भिल व इतर 90 ते 100 जणांच्या जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे. गावात मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.  

Web Title: Police inspector gunned down at Chhota Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.