महिलांना भूलथापा देऊन दागिने लंपास करणा:याला पोलीसांनी ठोकल्या बेडय़ा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:30 PM2019-09-23T12:30:52+5:302019-09-23T12:30:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वयोवृद्ध महिलांना भूलथापा देत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लंपास करणा:या ‘ठगा’ला एलसीबीच्या पथकाने औरंगाबाद येथे ...

Police loot jewelery by police: | महिलांना भूलथापा देऊन दागिने लंपास करणा:याला पोलीसांनी ठोकल्या बेडय़ा

महिलांना भूलथापा देऊन दागिने लंपास करणा:याला पोलीसांनी ठोकल्या बेडय़ा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वयोवृद्ध महिलांना भूलथापा देत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लंपास करणा:या ‘ठगा’ला एलसीबीच्या पथकाने औरंगाबाद येथे अटक करत बेडय़ा ठोकल्या़ 28 मे रोजी संशयिताने नंदुरबारात दोघा महिलांकडून दागिने लांबवले होत़े 
आसिफ अहमदखान खलील अहमदखान असे पोलीस पथकाने ताब्यात घेतलेल्या ठगाचे नाव आह़े रुकसानाबी हुसैन शाह, त्यांची सून शकिला शाह आणि रुकसानबी यांची मावशी नवशादबी असे फसवणूक झालेल्या महिलांची नावे आहेत़ 28 मार्च मे रोजी रुकसानाबी आणि शकिलाबी ह्या दोन्हीही नवापुर येथून कामानिमित्त नंदुरबार येथे आल्या होत्या़ यादरम्यान त्या नवशादबी यांना भेटल्या़ याठिकाणी तिघींचा संवाद सुरु असताना आसिफ खान याने तिघींसोबत ओळख काढून गप्पा करण्यास सुरुवात केली होती़ यावेळी त्याने तहसील कार्यालयातील मोठय़ा अधिका:यांसोबत ओळख असल्याचे सांगून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे अमिष दाखवले होत़े त्याच्या अमिषाला बळी पडत तिघीही आसिफ याच्यासोबत नंदुरबार तहसील कार्यालयात आल्या होत्या़ याठिकाणी तिघींचे दागिने काढून घेत एका पिशवीत ठेवत त्यांना कार्यालयात पाठवून पिशवी घेत आसिफ हा पळून गेला होता़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले हे करत होत़े त्यांना मिळालेल्या माहितीवरुन संबधित गुन्हेगार हा औरंगाबाद येथील असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने संशयित आसिफ खान रा़ कटकट गेट, नेहरु नगर, औरंगाबाद येथून ताब्यात घेतल़े 
दरम्यान अटकेतील आरोपी आसिफ याने राज्यातील विविध भागात अशाच प्रकारे मुस्लिम महिलांची फसवणूक केल्याचे समोर आले आह़े ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत, राकेश मोरे, विजय ढिवरे, अभय राजपूत यांच्या पथकाने केली़ 
 

Web Title: Police loot jewelery by police:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.