पोलीस पाटील आरक्षण : 50 गावांमध्ये राहणार ‘महिलाराज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:10 PM2018-04-26T13:10:09+5:302018-04-26T13:10:09+5:30

तळोदा व अक्कलकुवा तालुक्यांतील 165 जागांची सोडत

Police Patil Reservation: 50 Villages Will Be In 'Mahilaraj' | पोलीस पाटील आरक्षण : 50 गावांमध्ये राहणार ‘महिलाराज’

पोलीस पाटील आरक्षण : 50 गावांमध्ये राहणार ‘महिलाराज’

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 26 : तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील अनुक्रमे 46 व 119 अशा एकूण 165 गावात रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांची आरक्षण सोडत बुधवारी तळोदा येथे काढण्यात आली़ अक्कलकुवा तालुक्यात 36 तर तळोदा तालुक्यात 14 गावांचे पोलीस पाटीलपद महिला भुषविणार आहेत़
तळोदा येथील महसूल विभागातर्फे नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत पोलीस पाटील भरती समितीचे अध्यक्ष तथा तळोदा उपविभागीय अधिकारी विनयकुमार गौडा यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली़ ¨बंदु नामावली पध्दतीप्रमाणे शासकीय तरतुदीनुसार रिक्त पदे असलेल्या गावातील महिला आरक्षणाची निश्चिती संबंधित गावाच्या लोकसंख्येनुसार करण्यात आली़ आरक्षण सोडत काढल्यानंतर अक्कलकुवा तालुक्यात 119 रिक्त जागांपैकी जामडी, ठाणा, वडली, उखलसाग, विरपुर, वाण्याविहिर खुर्द, रामपूर, डोडवा, नेंदवान बुद्रुक, मांडवा, सुरगस, पिंप्रापाणी, जामली, सल्लीबार, अंबाबारी, गुडीडबर, मोठे उदेपूर, खडकापाणी, डीगीआंबा, वेलखेठी, जुना नागरमुठा, ब्रिटीश अंकुशविहिर, धनशी, सरी, मोवान, पिंदरीपाडा, वालांबा, वाण्याविहिर बुद्रुक, मोरखी, अरेठभ, भोकस, खापरान, पिमटी, उमरगव्हाण, महुपाडा, बोरीपाडा या 36 गावांतील 36 जागांवर तर तळोदा तालुक्यातील एकूण 46 रिक्त पदापैकी समोना, बिथामाळ, आष्टेतर्फे बोरद, अमोणी, एकधड, चिनोदा, जुवाणी, चौगाव बुद्रुक, गव्हाणीपाडा, गोपाळपूर, कुंडवे, कोठार, नळगव्हाण, मोड या 14 गावांना महिला राखिव पदांचे आरक्षण निघाले आह़े या ठिकाणी महिला राज असणार आह़े तळोदा तालुक्यातील शिफा फारुख पिंजारी तर अक्कलकुवा तालुक्यासाठी रेहान फारुख पिंजारी या लहानग्यांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली़ या वेळी प्रातांधिकारी विनयकुमार गौडा, तहसीलदार योगेश चंद्रे, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, अक्कलकुवा नायब तहसीलदार विजय कछुअे, आय़आय़ कोकणी, व्ही़व्ही़ पाटील यांच्यासह तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील पोलीस पाटील पदासाठी इच्छुक उमेदवार उपस्थित होत़े  तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील अनुक्रमे 46 व 119 अशा एकूण 165 गावात रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांची आरक्षण सोडत बुधवारी तळोदा येथे काढण्यात आली़ अक्कलकुवा तालुक्यात 36 तर तळोदा तालुक्यात 14 गावांचे पोलीस पाटीलपद महिला भुषविणार आहेत़
तळोदा येथील महसूल विभागातर्फे नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत पोलीस पाटील भरती समितीचे अध्यक्ष तथा तळोदा उपविभागीय अधिकारी विनयकुमार गौडा यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली़ ¨बंदु नामावली पध्दतीप्रमाणे शासकीय तरतुदीनुसार रिक्त पदे असलेल्या गावातील महिला आरक्षणाची निश्चिती संबंधित गावाच्या लोकसंख्येनुसार करण्यात आली़ आरक्षण सोडत काढल्यानंतर अक्कलकुवा तालुक्यात 119 रिक्त जागांपैकी जामडी, ठाणा, वडली, उखलसाग, विरपुर, वाण्याविहिर खुर्द, रामपूर, डोडवा, नेंदवान बुद्रुक, मांडवा, सुरगस, पिंप्रापाणी, जामली, सल्लीबार, अंबाबारी, गुडीडबर, मोठे उदेपूर, खडकापाणी, डीगीआंबा, वेलखेठी, जुना नागरमुठा, ब्रिटीश अंकुशविहिर, धनशी, सरी, मोवान, पिंदरीपाडा, वालांबा, वाण्याविहिर बुद्रुक, मोरखी, अरेठभ, भोकस, खापरान, पिमटी, उमरगव्हाण, महुपाडा, बोरीपाडा या 36 गावांतील 36 जागांवर तर तळोदा तालुक्यातील एकूण 46 रिक्त पदापैकी समोना, बिथामाळ, आष्टेतर्फे बोरद, अमोणी, एकधड, चिनोदा, जुवाणी, चौगाव बुद्रुक, गव्हाणीपाडा, गोपाळपूर, कुंडवे, कोठार, नळगव्हाण, मोड या 14 गावांना महिला राखिव पदांचे आरक्षण निघाले आह़े या ठिकाणी महिला राज असणार आह़े तळोदा तालुक्यातील शिफा फारुख पिंजारी तर अक्कलकुवा तालुक्यासाठी रेहान फारुख पिंजारी या लहानग्यांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली़ या वेळी प्रातांधिकारी विनयकुमार गौडा, तहसीलदार योगेश चंद्रे, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, अक्कलकुवा नायब तहसीलदार विजय कछुअे, आय़आय़ कोकणी, व्ही़व्ही़ पाटील यांच्यासह तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील पोलीस पाटील पदासाठी इच्छुक उमेदवार उपस्थित होत़े 
 

Web Title: Police Patil Reservation: 50 Villages Will Be In 'Mahilaraj'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.