द्विसदस्यीय प्रभागरचनेचा राजकीय पक्षांना फायदा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:32 AM2021-09-25T04:32:51+5:302021-09-25T04:32:51+5:30

शहादा पालिकेत गेल्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह १० जागांवर भारतीय जनता पक्ष, ११ जागांवर काँग्रेस, चार जागांवर एमआयएम व राष्ट्रवादी ...

Political parties will benefit from a two-member ward structure | द्विसदस्यीय प्रभागरचनेचा राजकीय पक्षांना फायदा होणार

द्विसदस्यीय प्रभागरचनेचा राजकीय पक्षांना फायदा होणार

Next

शहादा पालिकेत गेल्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह १० जागांवर भारतीय जनता पक्ष, ११ जागांवर काँग्रेस, चार जागांवर एमआयएम व राष्ट्रवादी तसेच अपक्ष प्रत्येकी एक असे २७ नगरसेवक विजयी झाले होते. गेल्यावेळीही द्विसदस्य प्रभागरचनेनुसार निवडणूक पार पडली होती. आगामी निवडणुका ही द्विसदस्यीय प्रभागरचनेनुसार पार पडणार आहे. यामुळे यात नुकसान टाळण्यासह मोठ्या प्रमाणात फायदा कसा होईल, याचे नियोजन विविध राजकीय पक्षांसह भावी नगरसेवकांकडून केले जात आहे. त्याचप्रमाणे पाच वर्षांच्या कालावधीत शहाद्यात राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाली असून राजकीय घडामोडी घडल्या आहेत. यामुळे निवडणुकीबाबत राज्य शासनाने घेतलेला निर्णय हा कोणाला फायदेशीर ठरणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

Web Title: Political parties will benefit from a two-member ward structure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.