राजकारण रंगले ‘लेटरहेड’च्या चर्चेने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:27 AM2021-01-17T04:27:37+5:302021-01-17T04:27:37+5:30

ग्रामपंचायत निवडणूक काळात बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेतून १५ लाख रुपयांचा निधी देण्याचे पत्र चंद्रकांत रघुवंशी यांच्या ...

Politics is colored by the discussion of 'letterhead' ... | राजकारण रंगले ‘लेटरहेड’च्या चर्चेने...

राजकारण रंगले ‘लेटरहेड’च्या चर्चेने...

Next

ग्रामपंचायत निवडणूक काळात बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेतून १५ लाख रुपयांचा निधी देण्याचे पत्र चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाने प्रसिद्धीस देण्यात आले. या पत्रावर ‘आमदार चंद्रकांत रघुवंशी’ असे नाव असून, त्यावर राजमुद्राही आहे. वृत्तपत्रातून त्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या पत्रावर त्यांचे राजकीय विरोधक भाजपचे डॉ. रवींद्र चौधरी व सामाजिक कार्यकर्ते दिनकर पाटील यांनी आक्षेप घेत थेट राज्यपाल व निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आचारसंहितेच्या भंगाबरोबरच रघुवंशी हे आमदार नसताना राजमुद्रा असलेल्या व आमदार लिहिलेल्या पत्रावर हे वृत्त दिल्याने राजमुद्रेच्या गैरवापराची तक्रार केली. ही तक्रार केल्यानंतर चंद्रकांत रघुवंशी यांनीही पोलिसांत फिर्याद देऊन आपल्या नावाने व आमदारकीच्या लेटरहेडवर कुणीतरी बोगस लेटरपॅडचा वापर करून निवेदन प्रसिद्ध केल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यासंदर्भात नंदुरबार शहर पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर विरोधकांनी पुन्हा डिसेंबरमध्ये दिलेल्या अशाच काही इतर विषयासंदर्भातील पत्रांचीही तक्रार केली आहे. या तक्रारींची चौकशी होऊन खरे-खोटे काय ते बाहेर येईलच. त्यामुळे हा विषय वेगळा असला तरी सध्या राजकीय गोटात ही चर्चा अधिक चर्चेची ठरली आहे. चंद्रकांत रघुवंशी हे सध्या जाहीर कार्यक्रमांमध्ये कुठे दिसून येत नाहीत. पालिकेच्या इमारतीचा ई-भूमिपूजन सोहळा व त्यांच्या कुटुंबियांतर्फे सुरू करण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या भूमिपूजन सोहळ्याव्यतिरिक्त ते इतर कार्यक्रमांना दिसलेले नाहीत. पण त्यांच्या या कथित पत्रामुळे जिल्ह्याचे राजकारण पुन्हा ‘रघुवंशीं’भोवती केंद्रीत होताना दिसून येत आहे.

Web Title: Politics is colored by the discussion of 'letterhead' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.