भूषा येथे नर्मदा नदीवरील पूजाविधी व यात्रा यंदा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:22 AM2021-01-13T05:22:16+5:302021-01-13T05:22:16+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी पूजाविधी व यात्रा रद्द करण्याचा निर्णय भूषा गावातील ग्रामस्थांनी व तालुका प्रशासनाने घेतला आहे. ...

Pooja and Yatra on Narmada river at Bhusha canceled this year | भूषा येथे नर्मदा नदीवरील पूजाविधी व यात्रा यंदा रद्द

भूषा येथे नर्मदा नदीवरील पूजाविधी व यात्रा यंदा रद्द

Next

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी पूजाविधी व यात्रा रद्द करण्याचा निर्णय भूषा गावातील ग्रामस्थांनी व तालुका प्रशासनाने घेतला आहे. तालुक्यातील नागरिकांनी याची खबरदारी घेत भूषा गावात संक्रांतनिमित्ताने येण्यास टाळावे, असे आवाहन ग्रामस्थ व धडगाव तालुका पोलीस ठाणे यांनी केले आहे. याबाबत भूषा गावातील ग्रामस्थ व धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.एस. गवळी, दिलीप महाजन यांच्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीस सरपंच कुसाल केल्ला पावरा, जाड्या पावरा, देवड्या पावरा, उषा पावरा व ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांच्या एकमताने व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उपविभागीय पोलीस अधिकारी घुमरे साहेब यांच्या निर्देशानुसार तसेच कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता भूषा गावातील नर्मदा नदीवर होणारी पूजाविधी व यात्रा रद्द करण्यात आली असून तालुक्यातील नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाने केले आहे.

Web Title: Pooja and Yatra on Narmada river at Bhusha canceled this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.