तापी जन्मोत्सवानिमित्त प्रकाशा येथे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:38 PM2019-07-09T12:38:43+5:302019-07-09T12:38:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : तापी जन्मोत्सवानिमित्त येथील सूर्यकन्या तापी नदीला भाविकांनी पूजाअर्चा करून सोळा शृंगारासह साडी अर्पण केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : तापी जन्मोत्सवानिमित्त येथील सूर्यकन्या तापी नदीला भाविकांनी पूजाअर्चा करून सोळा शृंगारासह साडी अर्पण केली. तापी नदीची आरती करुन प्रसादाचे वाटप करण्यात आले.
तापी जन्मोत्सवानिमित्त येथील संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांतर्फे तापी नदीत पूजा करून साडी अर्पण करण्यात आली. प्रारंभी सद्गुरु तोताराम महाराज मंदिर येथून भजनी मंडळाने सकाळी 10 वाजता वाजत-गाजत भजन म्हणत मिरवणूक काढली. मिरवणुकीत महिला-पुरुष भाविकांचा सहभाग होता. ही मिरवणूक चौधरी गल्लीमार्गे भैरव चौकाकडून संगमेश्वर महादेव मंदिरावर नेण्यात आली. तेथे राजनाथ भट यांनी विधीवत पूजा केली. संगमेश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष मोहन काशिनाथ चौधरी यांनी सप}ीक पूजा केली. या वेळी मंदिराचे सदस्य हरी दत्तू पाटील, किशोर मुरार चौधरी, गणेश तुमडू पाटील, महेंद्र भोई, शंकर चौधरी, अश्विन सोनार, नारायण चौधरी, मीराबाई पाटील, गुलाल पाटील, अशोक चौधरी, मधुकर पाटील, रामबाबा चौधरी आदींसह भाविक उपस्थित होते. कुंभदानासह सूर्य व तापी मातेची प्रतिमा असलेली लहान मूर्ती नदीत अर्पण करण्यात आली. इंद्र, यम, वरूण, कुबेर, ब्रrा यांना मोक्षप्राप्तीसाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर तापी नदीची ओटी भरून 108 मीटरची साडी अर्पण करण्यात आली. तापी महात्म्य वाचनानंतर आरती होऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले. तापी नदी बाराही महिने वाहिली पाहिजे यासाठी प्रार्थना करण्यात आली.