लोणखेडा ते पुरुषोत्तम नगर रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:34 AM2021-09-12T04:34:57+5:302021-09-12T04:34:57+5:30
या रस्त्याबाबत नागरिकांनी संबंधितांकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. परंतु संबंधित विभाग या समस्येवर कोणताही मार्ग काढताना दिसत नाही. यातून प्रवाशांचा ...
या रस्त्याबाबत नागरिकांनी संबंधितांकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. परंतु संबंधित विभाग या समस्येवर कोणताही मार्ग काढताना दिसत नाही. यातून प्रवाशांचा संयम सुटण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या मार्गावर सतत रहदारी सुरु असते. पुरुषोत्तम नगर येथे साखर कारखाना, डिस्टलरी व तत्सम उद्योगाच्या निमित्ताने अवजड वाहनांची सतत वर्दळ सुरु असते. कारखान्यात ट्रक, ट्रॅक्टर, टँकर, डंपर व इतर वाहनांची ये-जा सुरु असते. या रस्त्याने माल वाहून नेण्यासाठी संबंधित वाहनधारक हा रस्ता खराब असल्याने डिझेल, पेट्रोल अधिक लागते हे कारण सांगून जास्त भाडे आकारणी करतात. त्याचा नाहक आर्थिक भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो. या रस्त्याची बऱ्याच दिवसांपासून साधी डागडुजी ही केलेली नाही. रस्त्याच्या या अवस्थेमुळे वाहनधारकांमध्ये वाद होण्याच्या घटना सतत घडतात. हा रस्ता आता वेळेचा अपव्यय, डिझेल, पेट्रोलचे नुकसान, वाहनांची नादुरुस्ती यामुळे प्रवाशांना नकोसा झाला आहे. संबंधित रस्ते निर्मिती विभागाने यावर त्वरित मार्ग काढून हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.