पुनर्वसन ते काथर्दा रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:30 AM2021-09-11T04:30:46+5:302021-09-11T04:30:46+5:30
प्रकाशा ते म्हसावद या रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद झाले आहे. प्रकाशा ते काथर्दा पुनर्वसनपर्यंत डांबरीकरण झाले आहे. ...
प्रकाशा ते म्हसावद या रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद झाले आहे. प्रकाशा ते काथर्दा पुनर्वसनपर्यंत डांबरीकरण झाले आहे. मात्र पुनर्वसनपासून पुढे काथर्दा गावापर्यंत रस्त्याचे काम झालेले नाही. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे तर या रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे. खड्डे इतके मोठे आहे की चारचाकी वाहनाच्या चेसीस जमिनीला टच होतात. त्यामुळे गाडी बंद पडते व ढकलत पुढे जावे लागते. या रस्त्यावरुन दुचाकी व चारचाकी वाहन चालवणे म्हणजे कसरतच असते. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
प्रकाशा बसथांबा परिसरात काम बंद
प्रकाशा बसथांबा ते वैजाली चौफुलीपर्यंतच्या मार्गावर काम अपूर्ण आहे. रस्त्याची एक बाजू झाली आहे तर दुसऱ्या बाजूचे काम बाकी आहे, त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना अडचणी येतात. ज्या ठिकाणी काम अपूर्ण आहे तेथील दुकानावर ग्राहकांना ये-जा करण्यासाठीही त्रास होतो. गटारी उघड्या असून त्यातील पाणी रस्त्यावर येते. रस्त्याचे अपूर्ण काम ग्रामस्थांसाठी त्रासदायक ठरत आहे.