कोठवा नाल्यावरील पूलाचे बांधकाम अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:24 PM2018-03-13T13:24:23+5:302018-03-13T13:24:23+5:30

राज्यांच्या हद्दीचा वाद : पाच वर्षापासूून दुरूस्ती रखडली

Poor construction on Kothava Nullah | कोठवा नाल्यावरील पूलाचे बांधकाम अधांतरी

कोठवा नाल्यावरील पूलाचे बांधकाम अधांतरी

googlenewsNext

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 13 : महाराष्ट्र हद्दीतील 27 गावांना थेट राज्यमार्गासोबत जोडणा:या खेडले मार्गावरील गुजरात हद्दीतील कोठवा नदीचा पूल तीन वर्षानंतरही अधांतरी आह़े या पुलाचे बांधकाम कधी होणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आह़े 
बोरद परिसरातून ब:हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावर येण्यासाठी मोड मार्गाने खेडले व तेथून गुजरात हद्दीतील पिसावर गावार्पयत थेट रस्ता आह़े यात गुजरात हद्दीत कोठवा नाल्यावर पुलाचे बांधकाम काही वर्षापूर्वी करण्यात आले होत़े तीन वर्षापूर्वी हा पूल कोसळल्याने  वाहतूक नाल्याच्या पात्रातून सुरू झाली़ वर्षातील आठ महिने नाल्याच्या पात्रातून होणारी वाहतूक सुरू असत़े  तर उर्वरित चार महिने वाहतूक आमलाड मार्गाने होत आह़े यातून मोड, बोरद, कढेल, करडे, गुजाळी, मोहिदा व कळमसरे येथील ग्रामस्थांचे हाल होत आहेत़ गुजरात हद्दीतील या पुलाची दुरूस्ती करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही कारवाई झालेली नाही़ ग्रामस्थांनी यासाठी वारंवार गुजरात राज्यातील अधिका:यांच्या भेटी घेऊनही पूल बांधकामाबाबत सकारात्मक अशी चर्चा झालेली नसल्याने नाल्याच्या पात्रातूनच धोकेदायक पद्धतीने वाहतूक सुरू आह़े मार्गावरून दुचाकी, चारचाकी, तीनचाकी वाहनांसह ऊस आणि कापूस वाहून नेणारी वाहने नाल्याच्या पात्रातून आणली जात आहेत़ 
 

Web Title: Poor construction on Kothava Nullah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.