पडक्या स्लॅबचा धोका कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 12:19 PM2017-10-09T12:19:15+5:302017-10-09T12:19:22+5:30
दुर्लक्ष : बोरद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचा:यांची व्यथा
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचा:यांना देण्यात आलेली निवासस्थाने अतिशय जिर्ण झाले आह़े स्लॅब कोसळण्याचा धोका वर्तविन्यात येत आह़े याबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आल्यावरही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप कर्मचा:यांकडून करण्यात येत आह़े
तळोदा तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत़ त्यापैकी बोरद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला एकूण 20 गावे जोडण्यात आली आह़े त्यामुळे साहजिकच येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व येथील कर्मचा:यांचे अनन्यसाधारण महत्व आह़े परंतु या आरोग्य कर्मचा:यांना लागणा:या प्राथमिक सुविधांकडेच प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप आता करण्यात येत आह़े
कर्मचा:यांच्या निवासस्थानाची दुरावस्था झाली असून स्लॅब कोसळण्याची भिती अनेक कर्मचा:यांना वाटत असत़े परंतु अशाही परिस्थितीत येथील कर्मचारी याच ठिकाणी वास्तव्य करीत आहेत़ मागील कालखंडात जिल्हा परिषदेच्या अनेक अधिका:यांनी या निवासस्थानांना भेटी दिल्या़ परंतु याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे कर्मचा:यांकडून सांगण्यात येत आह़े दरम्यान, बोरद गावाची लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी कर्मचा:यांना दुसरीकडेही घरे उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात येत आह़े तसेच आधीच जेमतेम पगार असल्याने या कर्मचा:यांना दुसरीकडे राहुन घरभाडे भरणेही जड जात असत़े त्यामुळे शासनाकडून देण्यात आलेली हक्काची निवासस्थाने असतानाही अशा प्रकारे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचा:यांची हेडसांड होत असेल तर याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारण्यात येत आह़े
अशा पडक्या, जिर्ण घरांमध्येच पावसाळ्यातही कर्मचा:यांना मोठा त्रास होत असतो़ पावसाळ्यात स्लॅब गळत असल्याने घरात जागो-जागी भांडी ठेवण्याची वेळ येत असत़े दरम्यान, यामुळे स्लॅब कोसळून एखादी मोठा अपघात झाल्यास यास जबाबदार कोण असा प्रश्न आता विचारण्यात येत आह़े