प्रकाशातील जि़प़शाळेच्या गोरगरीब विद्यार्थ्यांनी अनुभवला प्रवासाचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 01:03 PM2020-01-23T13:03:20+5:302020-01-23T13:03:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुजरात राज्यातील देवमोगरा येथील याहा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुजरात राज्यातील देवमोगरा येथील याहा मोगी देवीचे दर्शनासह वनपर्यटन घडवून आणले़ शिक्षकांच्या या सह्रदयतेने पालकही भारावले होते़
उपक्रमशील शाळा अशी ओळख असलेल्या प्रकाशा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रामलाल पारधी, संगीता राणे, दर्पण भामरे, अनिता पाटील यांनी दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांना धार्मिक स्थळ दर्शनासह वनक्षेत्राची ओळख व्हावीसाठी यासाठी देवमोगरा येथे भेटीचे आयोजन केले होते़ यात प्रामुख्याने मोल-मजुरी करणाऱ्या पालकांच्या मुलांचा समावेश होता़ परिस्थिती अभावी कुठेही न गेलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करुन त्यांची ही सफर घडवून आणली गेली़ शिक्षकांनी स्वखर्चाने आयोजित केलेल्या या उपक्रमासाठी खाजगी लक्झरी बस करण्यात आली होती़ या प्रकारच्या बसमध्ये पहिल्यांदा बसल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहºयावर ओसंडून वाहत होता़
देवमोगरा येथील याहामोगी माता मंदिर आणि परिसरात आयोजित या क्षेत्रभेटीदरम्यान याहामोगी देवीच्या दर्शनासह विद्यार्थ्यांनी परिसरात भेट दिली़ यावेळी केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर हे विद्यार्थ्यांसोबत होते़ विद्यार्थ्यांनी याठिकाणी सहभोजन करत विविध खेळ खेळत, गप्पा, गाणी म्हणत धम्माल केली़
मुख्याध्यापक रामलाल पारधी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना शालेय सोबत ऐतिहासिक स्थळांची माहिती व्हायला पाहिजे़ यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होती़ यातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणबाबत गोडी निर्माण होईल़