स्वच्छतागृहांच्या बांधकामाची उदघाटनपूर्वीच झाली दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:52 PM2018-11-22T12:52:04+5:302018-11-22T12:52:09+5:30
धडगाव : नगरपंचायतीच्या निधीतून मंजूर केलेल्या स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी दुरवस्था झाली आह़े यातील बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृहाची प्रचंड दुर्दशा ...
धडगाव : नगरपंचायतीच्या निधीतून मंजूर केलेल्या स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी दुरवस्था झाली आह़े यातील बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृहाची प्रचंड दुर्दशा झाली असून ठेकेदाराने बांधकाम पूर्ण न करताच त्याचा वापर करण्याची मुभा दिल्याने हा प्रकार उद्भवला आह़े शहरात तीन ठिकाणी स्वच्छतागृह उभारणीला नगरपंचायतीने मंजूरी दिली होती़ यासाठी प्रत्येकी 22 लाख रूपयांचा खर्चही मंजूर केला आह़े
धडगाव, रोषमाळ बुद्रुक आणि वडफळ्या या तीन ग्रामपंचायतींचे एकत्रीकरण करत धडगाव येथे नगरपंचायतीची निर्मिती करण्यात आली आह़े यानंतर गेल्या दोन वर्षापासून विविध विकास कामांना मंजूरी देण्याचा धडका पदाधिकारी आणि प्रशासन यांनी लावला आह़े यातच बसस्टँट परिसर, कन्या शाळा परिसर आणि तळोदा रोड भागात नागरिकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहांच्या कामांना मंजूरी देण्यात आली होती़ प्रत्येक बांधकामासाठी 22 लाख 58 हजार रुपयांप्रमाणे 67 लाख 76 हजार रुपयांच्या निधीला मंजूरी देऊन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती़ गेल्या वर्षापासून या कामाला सुरुवात करण्यात आली होती़ यात बसस्थानकातील बांधकाम हे अंतिम टप्प्यात पोहोचून रंगरंगोटीही करण्यात आली होती़ यानंतर उद्घाटनाची प्रतिक्षा असतानाच देखरेखीअभावी या स्वच्छतागृहाचा वापर सुरु करण्यात आला़ परिणामी जागोजागी तूटफूट होऊन ड्रेनेजचे काम पूर्ण नसल्याने दुर्दशा झाली़ याबाबत ग्रामस्थांकडून विचारणा करण्यात आल्यावर नगरपंचायत प्रशासनाने ठेकेदाराकडे बोट दाखवत बिल रोखून धरल्याची माहिती दिली आह़े परंतू स्वच्छतागृहाच्या बांधकामास सुरुवात केली नाही़ इतर दोघी स्वच्छतागृहांची हीच स्थिती कायम आह़े बसस्थानक परिसरात यापूर्वी असलेले स्वच्छतागृह वर्षभरापूर्वी तोडल्यानंतर त्याजागी नवीन स्वच्छतागृह उभारण्याची मागणी होती़ स्वच्छतागृहच नसल्याने महिलांचे मोठे हाल होत होत़े नवीन बांधकाम केल्यानंतर नागरिकांची सोय झाली अशी अपेक्षा होत असतानाच त्याची अल्पावधीतच दुरवस्था झाल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े निर्माण झालेल्या या समस्येबाबत शहरात चर्चा रंगत असताना नगरपंचायतीचे पदाधिकारी मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आह़े पदाधिका:यांनी लक्ष घालून तिन्ही स्वच्छतागृहांची कामे तात्काळ पूर्ण करण्याची मागणी होत आह़े