निवडणूक निकालानंतर महाआघाडी पॅटर्नची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:22 AM2021-01-13T05:22:42+5:302021-01-13T05:22:42+5:30

यातून ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे पदाधिकारी असलेले नेते व कार्यकर्ते पॅनलच्या माध्यमातून ...

Possibility of grand alliance pattern after election results | निवडणूक निकालानंतर महाआघाडी पॅटर्नची शक्यता

निवडणूक निकालानंतर महाआघाडी पॅटर्नची शक्यता

Next

यातून ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे पदाधिकारी असलेले नेते व कार्यकर्ते पॅनलच्या माध्यमातून स्वतंत्रपणे लढत आहेत. विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू असताना पक्षाचा आदेश मानत निष्ठेने काम करणारे पुढारी व कार्यकर्ते निवडणूक प्रचारात पक्षाच्या चिन्हाचा किंवा पदाचा वापर न करता गावातील मुद्द्यांवर चर्चा करत असल्याने या निवडणुका राजकीय पक्षविरहित ठरत आहेत. असे असले तरी येत्या काळात ग्रामपंचायतीत बहुमत सिद्ध करून सरपंचपद मिळविण्यासाठी राज्यात सत्तेत असलेले किंवा विरोधात असलेल्या हातमिळवणी करण्याची वेळ आल्यास तसेही शक्य करून दाखविण्याचा निश्चय पुढारी व कार्यकर्त्यांचा आहे. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पदाधिकारी ज्या पक्षाचा असेल त्याच्या पॅनललाही त्याच पक्षाचा म्हणून ओळख मिळत आहे. केवळ एवढ्याचा एका बाबीतून ही निवडणूक राजकीय पक्षांसोबत निगडीत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे नंदुरबार तालुक्यात बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींवर मात्र महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांचाच बाेलबाला आहे. तीन ठिकाणच्या बिनविरोध ग्रामपंचायतीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील तोडगा काढून सरपंचपदावर हक्क सांगितला आहे.

निवडणुकीत एकमेकांचे उणे-दुणे काढणे टाळण्यावरच अधिक भर

दरम्यान, सध्या निवडणूक प्रचार सुरू असताना गावात गेल्या पाच वर्षांतील विकास आणि येत्या पाच वर्षांतील विकास यावरच बोलण्याची तसदी उमेदवार घेत आहेत.

केवळ गावातील मुद्द्यावर चर्चा होत असल्याने येत्या काळात ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी मदत लागल्यास वाद हाेऊ नये, म्हणून वादाचे मुद्दे टाळले जात असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

दरम्यान, याबाबत काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दिलीप नाईक यांना संपर्क केला असता, प्रकृती बरी नसल्याने आरामक करत असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकांचा येत्या आठवड्यात आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आघाडीची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली. दुसरीकडे काँग्रेसचे इतर पदाधिकारीही निकालानंतरच्या आघाडीसाठी अनुकूल असल्याचे सांगण्यात आले आहे.

ग्रामीण निवडणुका हा राजकारणाचा पाया आहे. तेथील स्थानिक नेत्यांची मते व विचारांना महत्त्व आहे. स्थानिक पातळीवर त्यांनी घेतलेल्या निर्णयांना पक्षीय पातळीवर स्थान आहे. यातून आघाडीसारखे निर्णय झालेले नाहीत. निकालानंतर मात्र चित्र बदलू शकते.

- डाॅ. अभिजित मोरे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

निकालानंतर चित्र बदलेल

नंदुरबार जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. १५ रोजी मतदान झाल्यानंतर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीनंतर निवडून येणाऱ्या जागांनुसार सरपंच पदावर दावे-प्रतिदावे होणार आहेत. यात मित्रपक्षांची गरज भासण्याची शक्यता आहे. पॅनलला संपूर्ण बहुमत न मिळाल्यास निवडून आलेल्या दुसऱ्या पॅनलच्या उमेदवाराला सोबत घेता यावे यासाठीही आतापासून फिल्डिंग लावली जात आहे.

गावपातळीवरील नेत्यांचा निर्णय हा महत्त्वाचा आहे. ते गावाचे राजकारण करत असल्याने त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये यापूर्वी झालेले वाद व भानगडींमुळे अनेकांचे संबंध खराब झाले आहेत. यामुळे या निवडणुका पक्षविरहीत व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. निकालानंतर बदल शक्य आहेत.

- डाॅ. विक्रांत मोरे

जिल्हाध्यक्ष, शिवसेना

Web Title: Possibility of grand alliance pattern after election results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.