भाडेवाढीने प्रवासी दुरावण्याची शक्यता.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 05:51 PM2018-06-19T17:51:21+5:302018-06-19T17:51:21+5:30
नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाने बसच्या भाडय़ात वाढ केल्याने याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांसह विद्याथ्र्यानाही बसत आह़े एसटीची भाडेवाढ झाली असली तरी, खाजगी वाहतूकदारांनी आपले भाडेदर स्थिर ठेवले असल्याने एसटीचा प्रवासी तुटून खाजगी वाहतूकदारांकडे वळण्याची भीती आता व्यक्त करण्यात येत आह़े
16 जूनच्या मध्यरात्रीपासून एसटी बसची 18 टक्के इतकी भाडेवाढ करण्यात आली़ एसटी कर्मचारी आंदोलनामुळे करावी लागलेली पगारवाढ, पेट्रोल-डिङोलच्या वाढत्या किमती यामुळे एसटीचे चाक अधिक तोटय़ात रुतले होत़े त्यामुळे महामंडळाच्या रिकाम्या तिजोरीत नाणे खणखणावे यासाठी एसटी बसची 18 टक्के इतकी घसघशीत भाडेवाढ करण्यात आली़ परंतु यामुळे सर्वसामान्य प्रवासी मात्र पुरता भरडला जात आह़े आधीच पेट्रोलच्या दरात वाढ झाली त्यात, बसचेही भाडे वाढले असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आह़े गाव तिथं रस्ता अन् रस्ता तिथं एसटी हे ब्रीदवाक्य ऐकायला जरी गुळचट असले तरी प्रत्यक्षात भाडेवाढीने प्रवासी आता एसटी बसकडे वळणार काय? असा प्रश्न निर्माण होत आह़े 18 टक्के भाडेवाढीने प्रवाशांकडून एसटीला पर्यायी व्यवस्था म्हणून आता रेल्वे व खाजगी वाहतुकीकडे पाहिले जात आह़े परंतु यातून एसटीला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आह़े भाडेवाढीमुळे प्रवाशांना अधिकचा आर्थिक बोजा सहन करावा लागणार आह़े
‘लॉँग रुट’च्या भाडय़ात मोठी वाढ
एसटी महामंडळाकडून करण्यात आलेल्या भाडेवाढीमुळे लांब मार्गावरील बसफे:यांचे दर प्रचंड वाढले आहेत़ ते पुढीलप्रमाणे, एसटी महामंडळाकडून करण्यात आलेल्या घसघशीत भाडेवाढीमुळे प्रवासी बेजार झाले आहेत़ लांब पल्ल्यासह स्थानिक बसफे:याच्या दरातही मोठी वाढ झाली असल्याने साहजिकच व्यवसाय, नोकरीनिमित्त रोज जिल्ह्यात एसटी बसने फिरणा:या नोकरदार मंडळींचा खिसाही आता मोठय़ा प्रमाणात खाली होणार असल्याचे दिसून येत आह़े एसटी भाडेवाढीचा परिणाम ग्रामीण भागात राहत असलेल्यांच्या अर्थकारणावर प्रत्यक्षरित्या होत आह़े जादा भाडे द्यावे लागणार असल्याने विद्यार्थी शाळेपासूनही दुरावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आह़े एसटी महामंडळाने केलेली भाडेवाढ विद्याथ्र्यासाठी शिथिल करण्यात यावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े भाडेवाढीचा बोजा ग्रामीण अर्थकारणावर घाला घालणार असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त होत आह़े
भाडेवाढ झाल्याने साहजिकच विद्याथ्र्याच्या सवलतीच्या पासेसमध्येही वाढ झाली आह़े त्यामुळे बस भाडेवाढीचा फटका विद्याथ्र्यानाही बसत असल्याचे दिसून येत आह़े गर्दीच्या हंगामात साध्या बसच्या पाससाठी प्रौढ प्रवाशांना सात दिवसांसाठी तब्बल 1 हजार 680 रुपये मोजावे लागणार आहेत़ तर पाच ते बारा वयोगटातील मुलांना 845 रुपये मोजावे लागतील़ तसेच कमी गर्दीच्या कालावधीत प्रौढांसाठी 1 हजार 550 तर मुलांसाठी 780 रुपये आकारले जातील़ त्यामुळे बस पासवर इतक्या प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करावा लागणार असल्याने पालकांसाठी डोकेदुखी वाढणार आह़े दुर्गम भागात मानव विकास मिशनअंतर्गत विद्यार्थिनीना बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत़ परंतु त्यातसुध्दा इतर प्रवाशांचे अतिक्रमण वाढत असल्याने विद्यार्थिनींसाठी समस्या अधिक वाढत आह़े