अतिदुर्गम भागातील द:याखो:यात उतरुन पाण्यासाठी करावी लागतेय कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:20 PM2019-06-02T12:20:32+5:302019-06-02T12:20:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : सातपुडय़ाच्या अतिदुर्गम द:याखो:याचा भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील कुकडीपादर ग्रामपंचायत अंतर्गत केवडीचा पाताईपाडा, कुईसापाडा अरेढी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : सातपुडय़ाच्या अतिदुर्गम द:याखो:याचा भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील कुकडीपादर ग्रामपंचायत अंतर्गत केवडीचा पाताईपाडा, कुईसापाडा अरेढी कुबाईपाडा, बोरविहीपाडा, पाटीलपाडा या पाडय़ांवर महिनाभरापासून पाण्याची पातळी खाली गेल्याने हातपंप बंद पडले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना दीड-दोन किलोमीटर भटकंती करीत झ:यातून पाणी गाळून पिण्यासाठी आणावे लागत आहे.
केवडीचा कुईसापाडा येथील ग्रामस्थ भटकंती करीत एक किलोमीटर अंतरावरील नाल्याच्या झ:यात तासन्तास थांबून हंडाभर पाणी गोळा झाल्यावर पाणी गाळून पिण्यासाठी आणतात. अरेढीचा बोरविहीपाडा येथे एक हातपंप असून महिनाभरापासून तो बंद असल्याने दोन किलोमीटर अंतरावरून केवडी अरेढी गावाच्या मध्यठिकाणी असलेल्या नाल्यातून पाणी आणावे लागत आहे. अरेढी येथे चार हातपंप असून एप्रिल महिन्यापासून हातपंप आटल्याने दीड किलोमीटर अंतरावरून भटकंती करीत चढउतारच्या दरीत खाली उतरून तयार केलेल्या नाल्यातून पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. पाटीलपाडा येथे दोन हातपंपाची पाण्याची पातळी एक महिन्यापासून खाली गेल्याने पाण्यासाठी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दरीत एका नाल्यातून पाणी आणावे लागते. मात्र याठिकाणी पाणी कमी असल्याने या पाडय़ांवरील नागरिकांना दोन किलोमीटर अंतरावर खोगदी नाल्यातील विहीरीवर गुराढोरांना पाणी पाजण्यासाठी तसेच स्वत: आंघोळीसाठी जावे लागत आहे. कुकडीपादरच्या तुरईपाडा येथे दोन्ही हातपंप आटल्याने तीन किलोमीटर अंतरावरून बारीपाडा येथील झ:यातून पाणी आणून तेथेच गुराढोरानांही पाणी पिण्यासाठी आणावे लागते.
अक्कलकुवा तालुक्यातील कुकडीपादर व त्याअंतर्गत येणारे पाडे हे अतिदुर्गम भागात आहेत. या पाडय़ांवर पाणीपुरवठय़ासाठी असलेले हातपंप पाणी पातळी खोल गेल्याने महिनाभरापासून बंद पडले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना नदी-नाल्यात ङिारे तयार करून पाणी मिळवावे लागत आहे. त्यासाठी एक ते तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते. हा भाग डोंगराळ असल्याने रस्ते नाहीत. परिणामी द:याखो:यात उतरुन चढउताराच्या रस्त्यावरून कसरत करीत पाणी आणावे लागते. तसेच आंघोळही याचठिकाणी करावी लागते. इतक्या लांबवरुन पाणी आणून गुराढोरांना पाणी पाजणे शक्य नसल्याने सोबत पाळीव जनावरांनाही पाणी पाजण्यासाठी न्यावे लागते.