चार कोटींचा भ्रष्टाचार करूनही संशयितांना कागदपत्रांचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:34 AM2021-09-22T04:34:05+5:302021-09-22T04:34:05+5:30

कागदपत्रांच्या या खेळात एकप्रकारे संगनमत करुनच हे खुलासे दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असतानाही जिल्हा परिषद प्रशासन गप्प का असा ...

The power of documents to the suspects despite the corruption of four crores | चार कोटींचा भ्रष्टाचार करूनही संशयितांना कागदपत्रांचे बळ

चार कोटींचा भ्रष्टाचार करूनही संशयितांना कागदपत्रांचे बळ

Next

कागदपत्रांच्या या खेळात एकप्रकारे संगनमत करुनच हे खुलासे दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असतानाही जिल्हा परिषद प्रशासन गप्प का असा सवाल शहरातून केला जात आहे.

विद्यमान बीडीओंचा विसंगत पत्रव्यवहार

नोव्हेंबर २०२० तत्कालीन गटविकास अधिकारी एम.जी.पाेतदार यांच्या अध्यक्षतेखाली चाैकशी समिती नेमून ९ जणांची चाैकशी करण्यात आली होती. २०१६ ते २०२० या काळातील परिपूर्ण दप्तर उपलब्ध नसल्याचे चाैकशी अहवालात नमूद करण्यात आले होते. चाैकशी समितीला चार वर्षांची ऑडिट नोट उपलब्ध न झाल्याने ही चाैकशी केल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. हा अहवाल नोव्हेंबर २०२० मध्ये जिल्हा परिषदेला देण्यात आला आहे. परंतु विद्यमान गटविकास अधिकाऱ्यांना चाैकशी सुरु असलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सर्व दप्तर दिल्याचा खुलासा दिला आहे आणि तो खुलासा विद्यमान गटविकास अधिकारी एन.बी.सूर्यवंशी यांनी मान्य करुन जिल्हा परिषदेला पत्रव्यवहार केला आहे. यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून दोन अधिकारी विसंगत पत्रव्यवहार जिल्हा परिषदेला करत असल्याने या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरतंय असा प्रश्न निर्माण होत आहे.

दरम्यान मोठमोठे गुन्हे उघडकीस आणणाऱ्या अक्कलकुवा पोलीस ठाण्याला या दप्तर चोरी प्रकरणातील भुरटे चोरही पकडण्यात यश येत नसल्याने शहरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: The power of documents to the suspects despite the corruption of four crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.