बोरद येथे यात्रेकरुंचे झाले पुजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:17 PM2018-02-15T12:17:53+5:302018-02-15T12:17:58+5:30

Powered by the pilgrims at Borod | बोरद येथे यात्रेकरुंचे झाले पुजन

बोरद येथे यात्रेकरुंचे झाले पुजन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : याहामोगी मातेच्या यात्रेसाठी जाणा:या म्हसावद व बोरद परिसरातील 700 भाविकांचे बोरद येथे औक्षण करुन पुजन करण्यात आल़े तसेच त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या़ 
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य नरहर ठाकरे, बोरद ग्रामपंचायतीचे सरपंच वासंतीबाई ठाकरे यांनी भाविकांना मार्गदर्शन करुन त्यांचा सत्कार केला़ तसेच परिसरात भाविकांच्या जेवनाचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती़ बोरद परिसरातून मोठय़ा प्रमाणावर भाविक गुजरात येथील  सातबारा येथे याहामोगी मातेच्या यात्रेसाठी रवाना होत असतात़ यातील बहूतेक भाविक हे पायीच वारीत सहभागी होत असतात़ 
त्यामुळे रोज विविध ठिकाणी त्यांचा मुक्काम असतो़ आदिवासी शेतकरी बांधव तसेच मजुर आपली सर्व शेतीची कामे आवरुन मातेच्या दर्शनासाठी जात असतात़ केवळ नंदुरबार जिल्ह्यातूनच नव्हे तर खान्देशातून भाविक याहामोगी मातेच्या यात्रेसाठी सातबारा येथे हजेरी लावत असतात़  बोरद परिसरातून दरवर्षी मोठय़ा संख्येने भाविक याहामोगी मातेच्या यात्रेला जाण्यासाठी पदयात्रेचे आयोजन करीत असतात़ या पदयात्रेला मार्गावर हजारो भाविक जुळत असतात़
 

Web Title: Powered by the pilgrims at Borod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.