तळीरामांची एसटी चालकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 09:10 PM2019-01-08T21:10:37+5:302019-01-08T21:10:48+5:30

शहादा : शहादा येथील साईबाबा स्टॉपजवळ मद्यधुंद अवस्थेतील तीन ते चार जणांनी एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री ...

Powered by Taslima ST driver | तळीरामांची एसटी चालकाला मारहाण

तळीरामांची एसटी चालकाला मारहाण

googlenewsNext

शहादा : शहादा येथील साईबाबा स्टॉपजवळ मद्यधुंद अवस्थेतील तीन ते चार जणांनी एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली़ 
नंदुरबार आगाराची बस (क्रमांक एमएच 14 बीटी 2073) शहादा येथून नंदुरबारकडे जात असताना तीन ते चार मद्यधुंद युवक बसमध्ये चढल़े बसमध्ये ब:यापैकी प्रवासी संख्या असल्याने ते थेट चालकाच्या कॅबिनमध्ये शिरल़े काही काळानंतर ते टवाळखोरी करत असल्याचे लक्षात आल्यावर चालकाने त्यांना हटकले असता त्यांनी चालक अनील दामूदर देवरे (36) यांना शिवीगाळ करीत मारहाण केली़ धावत्या गाडीत हा सर्व प्रकार घडत असल्याने प्रवासीदेखील काळी काळ भेदरले होत़े चालक देवरे यांच्या समयसुचकतेने बस अपघात होण्यापासून बचावली़ मोठी कसरत करुन बस थांबवताच तळीरामांनी बसमधून पळ काढला़ घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याच्या कर्मचा:यांनी धाव घेतली़ काहीच दिवसांपूर्वी शहादा आगारातील वाहकालादेखील मारहाणीची घटना घडली होती़ त्यामुळे दिवसेंदिवस चालक वाहकांना मारहाणीच्या घटना होत असल्याने कर्मचा:यांकडून चिंता व्यक्त केली जात आह़े दरम्यान, चालू बसमध्ये चालकास मारहाण होत असल्याने यातून अपघात होऊन ही घटना अनेकांच्या जीवावर बेतली असती़ दरम्यान, घटना घडल्यानंतर बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले होत़े घटनेचा पंचनामा होईर्पयत बस तेथेच उभी करण्यात आली होती़ रात्री उशिरार्पयत गुन्हा नोंदणीचे काम सुरु होत़े 
 

Web Title: Powered by Taslima ST driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.