जिल्ह्यात पुन्हा पावसाची रिपरिप दोन दिवस मुसळधारचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:01 PM2019-08-28T12:01:24+5:302019-08-28T12:01:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू आहे.दरम्यान, तापीच्या पाण्याची पातळी स्थिर आहे. येत्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू आहे.दरम्यान, तापीच्या पाण्याची पातळी स्थिर आहे. येत्या दोन दिवसात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात जुलैचा शेवटचा व ऑगस्ट महिन्याचा पहिल्या आठवडय़ात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे सर्वच नदी, नाल्यांना पूर आला होता. एक हजारापेक्षा अधीक घरांची पडझड झाली होती तर सहा हजार हेक्टरपेक्षा अधीक शेतीचे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता. जेमतेम गेल्या आठवडय़ात रस्त्याची डागडुजी करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यातच पुन्हा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे प्रशासनाने पुन्हा सतर्कता बाळगली आहे.
दिवसभर पावसाची रिपरिप
सोमवारी पहाटेपासूनच जिल्ह्यातील सर्वच भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. नंदुरबार, तळोदा व शहादा तालुक्यातील अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे जनजिवनावर त्याचा परिणाम दिसून आला. येत्या 24 तासात जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
शेती कामांना पुन्हा ब्रेक
सतत तीन आठवडे पावसाची संततधार राहिल्यामुळे शेती कामांना ब्रेक मिळाला होता. परिणामी शेतांमध्ये तण वाढले होते. निंदणी व कोळपणीसारखी कामे करता आली नव्हती. वेळेवर खतांचा व किटकनाशकांचा मात्रा देखील देता आला नव्हता. गेल्या आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेवून ब:यापैकी ऊन देखील पडले होते. त्यामुळे शेतक:यांनी जास्तीत जास्त आंतरमशागतीच्या कामांना वेग दिला होता. परिणामी शेती कामांना मजूर देखील मिळत नव्हते. अशातच पुन्हा पावसाची संततधार सुरू झाल्याने शेती कामांना ब्रेक लागला आहे.
प्रशासन सतर्क
जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. सर्व अधिकारी व कर्मचा:यांना मुख्यालयी थांबण्याच्या सुचना जिल्हाधिका:यांना देण्यात आल्या आहेत. नदी काठच्या गावांना दवंडीद्वारे माहिती देण्यात येत आहे.
हतनूर धरण पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन 26 ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजता धरणाचे सर्व 36 गेट पुर्ण उघडून सुमारे एक लाख 92 हजार क्युसेक्स प्रवाह तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे सारंगखेडा बॅरेजचे 15 गेट पुर्ण उघडण्यात आले असून सुमारे एक लाख 28 हजार क्युसेक्स, तर प्रकाशा बॅरेजचे आठ गेट पुर्ण उघडण्यात येऊन एक लाख 44 हजार क्युसेक्स पाणी तापी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. तापी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे व नदी काठावार थांबू नये, असे जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.