नंदुरबार जिल्ह्यात लागवडीसाठी 14 लाख झाडे तयार
By admin | Published: June 25, 2017 05:39 PM2017-06-25T17:39:14+5:302017-06-25T17:39:14+5:30
हरित जिल्ह्यासाठी प्रयत्न : सामाजिक वनीकरण विभागाकडून वाटप सुरू
Next
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.25 : शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत सामाजिक वनीकरण विभागाकडून 1 जुलै रोजी होणा:या वृक्षारोपणासाठी तब्बल पावणे दोन लाख खड्डे आणि 14 लाख रोपांची निर्मिती करण्यात आली आह़े या झाडांचे वाटप सामाजिक वनीकरण व वनविभाग यांच्याकडून वनमहोत्सव केंद्रातून सुरू करण्यात आले आह़े
सामाजिक वनीकरण विभागातर्फे यंदा एक जुलै रोजी होणा:या वन महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत आह़े यासाठी 14 लाख 11 हजार झाडांची निर्मिती करण्यात आली आह़े नंदुरबार जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या तोरणमाळ, बिलगाव, अक्राणी प्रादेशिक, अक्राणी रोहयो, काकर्दा, शहादा, नवापूर, चिंचपाडा, नंदुरबार रोहयो आणि नंदुरबार प्रादेशिक या 15 रोपवाटिकांमध्ये लागवडीसाठच्या रोपांची निर्मिती करण्यात आली आह़े निर्माण करण्यात आलेल्या या 14 लाख झाडांपैकी वनविभागाला 7 लाख 12 हजार, विविध ग्रामपंचायतींना 2 लाख 44 हजार तर इतर सेवाभावी संस्थांना 1 लाख तीन हजार झाडांचे वाटप करण्यात येणार आह़े सर्वरित झाडे सामाजिक वनीकरण विभाग वाटप करणार आह़े तसेच तयार केलेल्या 1 लाख 76 हजार खड्डय़ांमध्ये त्याची लागवड करणार आह़े सामाजिक वनीकरण विभागाकडून 25 जून ते 5 जुलै या दरम्यान रोपे आपल्या दारी हा उपक्रम सुरू होणार आह़े