ग्लोबल उत्सवासाठी ‘माती’चा बाप्पा होतोय सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 12:24 PM2018-09-05T12:24:39+5:302018-09-05T12:24:46+5:30

अखेरचा हात फिरवण्यास सुरूवात : 95 टक्के मूर्तीचे बुकींग, सोशल मिडियाद्वारेही विक्री

Prepare the 'Mother's Baptism' for the Global Fest | ग्लोबल उत्सवासाठी ‘माती’चा बाप्पा होतोय सज्ज

ग्लोबल उत्सवासाठी ‘माती’चा बाप्पा होतोय सज्ज

Next

नंदुरबार : गेल्या काही वर्षात ग्लोबल झालेला गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याचा आग्रह सध्या सुरू आह़े या आग्रहात शाडू किंवा काळी माती वापरून गणेशमूर्ती तयार करण्याचे आवाहन सातत्याने होत आह़े परंतू आज होणारा हा आग्रह नंदुरबार शहरातील मंडळे आणि भाविक यांच्याकडून किमान 130 वर्षापासून केला जात असून काळ्या मातीतून घडणा:या मूर्तीची प्रमुख बाजारपेठ म्हणून नंदुरबार शहर नावरूपास आले आह़े   
संपूर्ण काळी माती वापरून श्रींची सुबक मूर्ती तयार करण्याची सुरूवात नंदुरबार शहरातील मूर्ती कारागिरांनी केली होती़ काळ्या मातीतील मूर्तीची ही परंपरा शहरात आजही कायम असून शहरातील कारखान्यांमध्ये काळ्या मातीपासून निर्माण झालेल्या गणेश मूत्र्या यंदाही महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यातील गणेश मंडळ आणि भाविकांच्या घरात स्थान मिळवणार आहेत़ अवघ्या आठवडाभरावर  गणेशोत्सव येऊन ठेपला असल्याने शहरातील सर्वच छोटय़ा आणि मोठय़ा मूर्तीकारांची लगबग सुरू असून सध्या शहरातील गणेशमूर्ती तयार करणा:या कार्यशाळांमध्ये तब्बल 18 तास  कामकाज चालत आह़े सर्व मूर्ती आकारास आल्याने त्यांच्यावर अखेरच्या टप्प्यातील रंगकाम, मूर्तीवर कपडे चढवणे, दागिने तयार करणे यासह विविध कामे उरकण्याची लगबग मूर्तीकारांकडून सुरू आह़े 
कुंभारवाडा भागातील नारायण वाघ व अशोक कुंभार यांच्या कलाशाळेत यंदा सहा इंच ते 21 फूट उंचीच्या गणेशमूर्तीची निर्मिती झाली असून दागिन्यांवर खडे बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आह़े वर्षातील आठ महिने या कामात पूर्ण झोकून देणा:या कुंभार बंधूनां अंतिम दिवसात त्यांचे संपूर्ण कुटूंबच मदत करत़े घरातील महिलांकडून खडे लावणे, जरीची वस्त्रे चढवणे, कडे पाटल्या यांचे रंगकाम तर पुरूष मंडळींकडून छोटय़ा मूर्तीचे रंगकाम करण्यात येत आह़े 
कुभांरवाडय़ातच अनिल कुंभार यांचा काळ्या मातीपासून गणेश निर्मिती करण्याचा छोटा कारखाना आह़े केवळ हाताने घडवण्यात येणारे गणपती आणि हातानेच त्यावर केले जाणारे रंगकाम यामुळे त्यांच्या मूत्र्या ह्या वर्षभरापासून बुक असतात़ यंदाच्या हंगामात त्यांनी साडेतीनशे गणेश मूर्ती घडवल्या आहेत़ यातील बहुतांश मूत्र्यांची निर्मिती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आह़े शहरात गणेशमूर्ती तयार करण्याचे 25 कारखाने सुरू आहेत़ यात सर्वच ठिकाणी शाडू मातीच्या मूर्ती तयार केला जातात़ परंतू सात ते आठ ठिकाणी काळी माती आणि शाडू माती यांच्या मिश्रणातून गणेश मूर्ती तयार करण्यात येत आहेत़ अवघ्या आठ दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने सर्वच कारखान्यांमध्ये कामाच्या वेळा वाढल्या आहेत़ सध्या तब्बल 18 तास कारखाने सुरु ठेवले जात आहेत़ 
राजस्थानातील बिकानेर परिसर, गुजरात राज्यातील भरूच, सुरत, मांडवी आणि बिल्लीमोरा, मध्यप्रदेशातील इंदौर आणि महू येथे यंदा मूर्ती पाठवण्यात येणार आहेत़ यासाठी सोशल मिडियाद्वारे बुकींग करण्यात आले आह़े जवळपास 95 टक्के बुकींग झाल्याची माहिती आह़े 
संपूर्ण राज्यापैकी केवळ नंदुरबार शहरात काळ्या मातीपासून मूर्ती घडवल्या जात आहेत़ या मूर्तीना हाताने तयार केलेले रंग देण्यात येतात़ संपूर्ण काळ्या मातीपासून शहरातील मानाच्या गणेश मूर्तीची निर्मिती करण्यात येत़े या मूर्तीचे कामही अंतिम टप्प्यात असून दोन दिवसात त्यांचे रंगकाम पूर्ण होणार आह़े 
 

Web Title: Prepare the 'Mother's Baptism' for the Global Fest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.