नंदुरबार जिल्ह्यात 289 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 09:01 PM2019-03-22T21:01:15+5:302019-03-22T21:01:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील 289 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 197 जणांना अजामिनपात्र वॉरंट काढण्यात आले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील 289 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 197 जणांना अजामिनपात्र वॉरंट काढण्यात आले आहेत. आतार्पयत सहा अनधिकृत शस्त्रे देखील जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर उपद्रवक्षम लोकांवर आणि संशयीत आरोपींवर कारवाई करण्यात येत आहे. 10 मार्च रोजी आचारसंहिता सुरू होताच कारवाईला गती देण्यात आली आहे. यासाठी पोलीस दलातर्फे विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. याअंतर्गत आतार्पयत 189 जणांवर फौजदारी प्रक्रिया संहिता प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यातील 166 जणांकडून चांगल्या वर्तवणुकीसाठी बॉण्ड घेण्यात आले आहेत. याशिवाय सहा अनधिकृत शस्त्र जप्त करण्यात आली असून त्यात एक पिस्टल, पाच धारदार शस्त्रे यांचा समावेश आहे. संबधीतांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. तीन तडीपार आरोपींनी कायद्याचा भंग केल्याने त्यांना अटक करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एकुण 197 जणांना अजामिनपात्र वॉरंटची बजावणी करण्यात आली आहे. 2019 मध्ये आचार संहितेपुर्वी 95 व आचारसंहिता चालू झाल्यापासून आतार्पयत 20 पाहिजे असलेल्या आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. यासाठी विशेष मोहिम देखील राबविण्यात येत असून पथकही स्थापन करण्यात आले आहे. परवानाधारक 272 जणांकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. आचारसंहिता काळात आतार्पयत 50 दारूबंदीच्या केसेस करण्यात आल्या असून एकुण दहा लाख 95 हजार 391 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या गुजरात व मध्यप्रदेश राज्यातून अवैध दारू, शस्त्रे यांची वाहतूक होणार नाही याकरीता तसेच फरार व पाहिजे असलेले आरोपी पकडणे कामी वरिष्ठ अधिकारी यांच्यात आपसात समन्वय होवून माहितीची देवाण-घेवाण आतार्पयत चार ठिकाणी बैठका झाल्या आहेत. त्यात मध्यप्रदेशातील अलीराजपूर, महाराष्ट्रातील नंदुरबार व पाल, गुजरातमधील वलसाड या ठिकाणांचा समावेश आहे.
लगतच्या राज्य सिमेवरील 16 ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. मध्यप्रदेशलगत पाच, गुजरातलगत 11 ठिकाणी ते कार्यरत राहणार असून आतार्पयत सहा ठिकाणी ते सुरू करण्यात आले असल्याची माहितीही पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिली.