900 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:11 PM2019-09-02T12:11:58+5:302019-09-02T12:12:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गणेशोत्सवासाठी भाविक सज्ज झाले आहेत. रविवार सुटीचा दिवस असल्याने भाविकांनी घरगुती आणि मंडळांनी आपल्या ...

Preventive action against 900 people | 900 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

900 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

Next
कमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गणेशोत्सवासाठी भाविक सज्ज झाले आहेत. रविवार सुटीचा दिवस असल्याने भाविकांनी घरगुती आणि मंडळांनी आपल्या नोंदीच्या मूर्ती घेवून जाण्यासाठी बाजारात मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. दुसरीकडे पोलिसांनी देखील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तयारी केली आहे. 900 जणांवर कारवाई करीत 31 जणांना उत्सव काळात हद्दपार करण्यात आले आहे. यंदा गणेशोत्सव आणि मोहरम सोबतच आले आहेत. त्यामुळे धार्मिक भावना वाढीस लागावी व दोन्ही सण उत्साहात साजरे केले जावे यासाठी प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे. त्याला दोन्ही समाजाने प्रतिसाद दिला. त्यामुळे प्रशासनावरील ताण मोठय़ा प्रमाणावर कमी झाला आहे.मूर्ती घेण्यासाठी गर्दीरविवार सुटीचा दिवस असल्याने गणेशमूर्ती घेण्यासाठी भाविकांची आणि मंडळ कार्यकत्र्याची मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. नंदुरबारातील नाटय़मंदीर ते दिनदयाल चौक या परिसरात मूर्ती विक्रेत्यांची दुकाने आहेत तेथे खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. परिणामी वेळोवेळी वाहतुकीची कोंडी देखील होत होती. याशिवाय शहरातील देसाईपूरासह परिसरात असलेल्या मूर्ती कारखान्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर मंडळ कार्यकत्र्यानी मोठी वाहने आणून आपल्या नोंदीच्या मूर्ती नेल्या. त्यामुळे रविवारी दिवसभर शहरातील विविध भागात मूर्ती घेवून जाणा:यांची मोठी लगबग दिसून आली. मूर्ती विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे. सोमवारी दुपार्पयत देखील मूर्ती विक्री मोठय़ा प्रमाणावर होणार आहे.सराईत गुन्हेगारांवर कारवाईसण व उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाने सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई सुरू केली आहे. यंदा गेल्या वर्षाप्रमाणेच गणेशोत्सव व मोहर्रम एकाचवेळी आलेले आहेत. त्यामुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण राहणार आहे. पोलिसांनी जवळपास 900 जणांवर कारवाई केली आहे. सीआरपीसी कलम 107 प्रमाणे 598, कलम 110 प्रमाणे 69, कलम 109 प्रमाणे एक, सीआरपीसी कलम 149 प्रमाणे 124 अशा एकुण 792 सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यातील फरार असलेल्यांपैकी 156 जणांना पकडण्यात आले असून महिनाभरातच 13 जणांना पकडण्यात यश मिळाले आहे.महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55, 56 व 57 प्रमाणे आतार्पयत 22 सराईत गुन्हेगारांविरुद्ध दोन वर्ष हद्दपारीचे प्रस्तावीत आहे. दारुबंदी कायद्यान्वये 29 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. 144 (2) प्रमाणे 40 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. सण, उत्सवांच्या काळात त्यांना शहरात प्रवेशाला प्रतिबंध करण्यात आला आहे. 2018 मध्ये 31 जणांवर हद्दपारीची कारवाई झालेली आहे. दोन पोलीस उपअधीक्षक, 10 फौजदार, 50 पुरुष व 50 महिला पोलीस, 600 पुरुष व 100 महिला होमगार्ड व एक राज्य राखीव पोलीस दलाची कंपनी असा बंदोबस्त बाहेरून मागविण्यात आला आहे. याशिवाय पोलीस अधीक्षक, अपर अधीक्षक, तीन उपअधीक्षक, 16 पोलीस निरिक्षक, 44 सहायक व उपनिरिक्षक, 668 पोलीस कर्मचारी, 90 महिला पोलीस कर्मचारी, सात स्ट्राईकिंग फोर्स, दोन आरसीपी प्लाटून, एक क्यूआरटी प्लाटून असा बंदोबस्त राहणार आहे. याशिवाय अतिरिक्त विशेष दंडाधिकारी देखील नियुक्त करण्यात आले आहेत. यंदा गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र आल्याने धार्मिक भावना वाढीस लागावी यासाठी पोलिसांनी प्रय} सुरू केले आहेत. गणेश विसजर्न मिरवणुकीनंतर आखाडे मिरवणुका काढाव्या यासाठी पोलिसांकडून आवाहन करण्यात आले. त्याला प्रतिसाद देत मुस्लिम समाजाने आणि आखाडे प्रमुखांनी गणेशोत्सवानंतर मोहरमच्या आखाडे मिरवणुका काढण्याचा निर्णय घेतला. यामुळे फारूक गनी मेमन, साजिद शेख रफिकोद्दीन, लियाकत अली बागवान, जुम्मा इस्माईल खाटीक, सत्तार शेख कादर मन्सुरी, सैय्यद रफअत हुसेैन या तालीम संघ पदाधिका:यांचा सन्मान करण्यात आला. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, पोलीस निरिक्षक सुनील नंदवाळकर उपस्थित होते. गेल्या वर्षाप्रमाणे यंदा देखील सर्व आखाडे प्रमुखांनी सहकार्य केल्याबद्दल अपर पोलीस अधीक्षकांनी आभार व्यक्त केले. जिल्ह्यात खाजगी 240 तर 549 सार्वजनिक व एक गाव एक गणपतींची नोंदणी करण्यात आली आहे. एकुण नऊ टप्प्यात विसजर्न केले जाणार आहे. दिड दिवसांचे एकुण 11 गणेश विसजर्न होणार आहेत. त्यात सार्वजनिक एक व खाजगी दहा, तिस:या दिवशी सार्वजनिक एक व खाजगी दहा, पाचव्या दिवशी 162 सार्वजनिक आणि एक गाव एक गणपती तर 68 खाजगी गणपती, सहाव्या दिवशी 60 सार्वजनिक व दहा खाजगी गणपतींचे विसजर्न होणार आहे. सातव्या दिवशी 131 सार्वजनिक व एक गाव एक गणपती तर 79 खाजगी गणेश मंडळे, आठव्या दिवशी चार सार्वजनिक, नवव्या दिवशी 40 सार्वजनिक तर 12 खाजगी मंडळ, दहाव्या दिवशी 11 सार्वजनिक तर सात खाजगी गणेश मंडळे आणि अनंत चतुदर्शीच्या दिवशी 139 सार्वजनिक व 40 खाजगी गणेश मंडळांतर्फे विसजर्न मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्या दृष्टीने बंदोबस्ताचे नियोजन पोलिसांनी करून ठेवले आहे.

Web Title: Preventive action against 900 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.