भाजीबाजारात हिरव्या भाज्यांचे दर गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 12:08 PM2020-07-22T12:08:32+5:302020-07-22T12:08:40+5:30

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात पावसाने दिलेल्या खंडामुळे भाजीपाला उत्पादन घटले आहे़ यातून बाजार समितीत ...

The price of greens skyrocketed in the vegetable market | भाजीबाजारात हिरव्या भाज्यांचे दर गगनाला

भाजीबाजारात हिरव्या भाज्यांचे दर गगनाला

Next

भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात पावसाने दिलेल्या खंडामुळे भाजीपाला उत्पादन घटले आहे़ यातून बाजार समितीत होणारी भाजीपाला आवक कमी होवून भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत़ यात नंदुरबार बाजार समितीत भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार रात्री होत असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत़
नंदुरबार बाजार समितीत तालुक्याच्या विविध भागासह लगतच्या धुळे जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातून नियमित भाजीपाला विक्रीसाठी आणला जातो़ तीन महिन्यांपूर्वी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर बाहेरील जिल्ह्यातून होणारा भाजीपाला पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता़ लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर ही आवक पूर्ववत होणे अपेक्षित होते़ परंतू नंदुरबार बाजार समितीत भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार हे रात्री सुरू झाल्याने ही आवक वाढण्याऐवजी कमीच राहिली आहे़ तूर्तास नंदुरबार तालुक्यात पावसाने दिलेल्या खंडामुळे भाजीपाल्याची आवक आणखी कमी होवून दरांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे़ टोमॅॅटोसह हिरवा भाजीपाला ५० रुपये किलोपेक्षा अधिक दराने विक्री होत असल्याने सामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे़ बाजारात सहजपणे नजरेस पडणारा टोमॅटो महाग झाल्याने गृहिणींचीही पंचाईत झाली आहे़ सोबत पावसाळ्यात मुबलक मिळणाºया भाज्यांचे दर हे प्रतिकिलो १० ते १५ रुपयांनी वाढले असल्याने खरेदीवर परिणाम झाला आहे़

या कारणामुळे
भाज्यांचे भाव वाढले
४ठोक बाजारात भाज्यांची आवकच कमी असल्याने भाव वाढले आहेत़ वाहतूक व्यवस्थाच नसल्याने शेतकरी येऊ शकत नाहीत़ यातून बºयाच जणांनी गेल्या तीन महिन्यात भाजीपाला लागवडीला ब्रेक दिला आहे़
४लॉकडाऊनपूर्वी भाव खाणारा कांदा लॉकडाऊन काळात स्वस्त झाला होता़ यातून वाहतूक व्यवस्था नसल्याने अनेकांनी कांदा पीक शेतात सोडून दिले़ तर काहींनी कांदा थेट पाळीव शेळ्या-मेंढ्या आणि गुरांना टाकून दिला़
४पावसाने ताण दिल्याने लागवड केलेला भाजीपाला गेल्या ३० दिवसात फूलू शकलेला नाही़ यातून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणाव नुकसान झाले असून अनेक ठिकाणी भाजीपाला पिकांवर मर आला आहे़

भेंडी स्वस्त परंतू खरेदीत सुस्त
नंदुरबार आणि नवापूर तालुक्यात भेंडीचे मुबलक उत्पादन घेतले जाते़ यंदाही बाजारात भेंडीची आवक आहे़ यातून किलोमागे ३० रूपयांपर्यंत भेंडी भेटत आहे़ मात्र दर कमी असतानाही आवक भरपूर असल्याने भेंडीची म्हणावी तशी खरेदी होत नसल्याचे चित्र सध्या बाजारपेठेत दिसून आले आहे़ भेंडी विक्रेते दिवभरात चार ते पाच किलो भेंडी किरकोळ स्ववरूपात विक्री करत आहेत़

बाजारपेठेत लिंबूच्या दरांमध्ये मात्र घट आल्याचे चित्र आहे़ तालुक्याच्या विविध भागात यंदा लिंबू बागा बहरल्या आहेत़ यातून लिंबू ठोक बाजारात २० रूपये किलो दराने मिळत आहे़ यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लिंबाची मोठी विक्री होत आहे़ बाजारात दर दिवशी १०० कॅरेटपेक्षा अधिक लिंबू विक्रीसाठी शेतकरी घेऊन येत आहेत़

टोमॅटोला सफरचंदाचा भाव
नंदुरबारच्या बाजारात तूर्तास टोमॅटो हा ३० ते ४० रूपये किलो दराने मिळत आहे़ दोन दिवसांपूर्वी टोमॅटो ५० रूपयांच्या पुढे गेला होता़ ठोक बाजारात दिवसाला २०० कॅरेटपर्यंतच मालाची आवक होत असल्याने दरांमध्ये वाढ झाली आहे़

Web Title: The price of greens skyrocketed in the vegetable market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.