आदिवासी सहकारी साखर कारखान्याकडून उसाला एकरकमी 2308 रुपये भाव जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:07 AM2018-10-31T11:07:46+5:302018-10-31T11:07:51+5:30
नंदुरबार : आदिवासी सहकारी साखर कारखान्याकडून यंदा एका हप्त्यात दोन हजार 308 रुपये प्रतीटन उसाला भाव देण्यात येणार असल्याचे ...
नंदुरबार : आदिवासी सहकारी साखर कारखान्याकडून यंदा एका हप्त्यात दोन हजार 308 रुपये प्रतीटन उसाला भाव देण्यात येणार असल्याचे चेअरमन शिरीष नाईक यांनी गाळप हंगामाच्या शुभारंभप्रसंगी जाहीर केले.
डोकारे साखर कारखान्याचा गळीत हंगाम व गव्हाण पूजन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते सप}ीक करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार सुरूपसिंग नाईक होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावीत, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, जि.प. अध्यक्षा रजनी नाईक, जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावीत, मुख्य कार्यकारी अधिकारी रणवीर सोमवशी, सेवानिवृत्त साखर आयुक्त डी.बी. गावीत, द्वारकाधीश साखर कारखान्याचे संचालक सावंत, जिल्हा उपनिबंधक एस.वाय. पुरी, व्हा.चेअरमन सखाराम गावीत, शेतकरी सहकारी संघाचे सभापती अजित नाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दीपक नाईक, तहसीलदार सुनीता ज:हाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, सहायक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, नगरसेवक आरिफ बलेसरीया, अजय पाटील, विरोधी गटनेते नरेंद्र नगराळे, प्रकाश पाटील, सुभाष कुंभार, विनोद नाईक, पं.स. उपसभापती दिलीप गावीत, छगन वसावे, फत्तेसिंग नाईक, मगन वळवी, विनोद नाईक, भामटू भिल, नथ्थू गावीत, लक्ष्मण कोकणी, सयाबाई नाईक, विना वसावे आदी उपस्थित होते.
शिरीष नाईक म्हणाले की, शेतक:यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतात जास्तीत जास्त उसाचे उत्पादन घ्यावे व शेतक:यांनी बाहेर ऊस न देता आपला ऊस आदिवासी साखर कारखान्याला द्यावा. गेल्यावर्षी गुजरात राज्यातील साखर कारखान्यांना काही शेतक:यांनी ऊस दिला. परंतु अजूनही पैसे मिळाले नाही. काही खाजगी साखर कारखाने वजनकाटय़ात फेरफार करून आदिवासी गोरगरीब व कष्टकरी शेतक:यांची फसवणूक करून मापात पाप करतात. या सर्व बाबतीत निश्चित खात्री असलेल्या आदिवासी सहकारी साखर कारखान्यात आपला ऊस द्यावा, असे नाईक यांनी सांगितले.
माणिकराव गावीत म्हणाले की, सुरूपसिंग नाईक यांच्या सहकार्याने तालुक्यात आदिवासी जनतेचा शाश्वत विकास केला आहे. तालुक्यात धरणे बांधून शेतीसाठी पाण्याची सोय केली आहे. यातून तालुक्याचा विकास झाला आहे. तालुक्यात चार हजार मेट्रीक टन उसाची लागवड करण्यात आली आहे. आदिवासी साखर कारखान्यात शेतक:यांची लूट होत नाही. आज घरापासून ते शेतार्पयत ट्रॅक्टर व मोटारसायकलीने शेतकरी जात आहेत याचे आम्हाला समाधान आहे, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन दिलीप पवार यांनी केले. कार्यक्रमासाठी आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचा:यांनी परिश्रम घेतले.