मोलगी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:33 AM2021-09-21T04:33:23+5:302021-09-21T04:33:23+5:30
पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ दरवर्षी सिल्वर झोन फाऊंडेशन यांच्या सहयोगाने आंतरराष्ट्रीय सायन्स ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षा आयोजित करते. या ...
पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ दरवर्षी सिल्वर झोन फाऊंडेशन यांच्या सहयोगाने आंतरराष्ट्रीय सायन्स ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षा आयोजित करते. या परीक्षेत मोलगी येथील आश्रमशाळेच्या १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये जतीन रवींद्र भोई याने सुवर्ण, तर राधेय धीरसिंग तडवी या विद्यार्थ्याने रजत पदक पटकावले. प्राथमिक मुख्याध्यापक दिलीप नगराळे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व समजावून सांगितले. विज्ञान शिक्षिका राजश्री चौधरी यांनी सायन्स ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेचे स्वरूप आणि उद्देश याविषयी माहिती दिली. पालक रवींद्र भोई यांनी पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ ही संस्था दरवर्षी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग आणि कार्यक्रम घेत असल्याचे सांगितले. या परीक्षेचे आयोजन मुख्याध्यापक दिलीप नगराळे, नटवर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान मंडळ प्रमुख राजश्री चौधरी, शिवदास वसावे, संजय बोरसे यांनी केले. यावेळी राहुल पाटील, ज्योती तडवी, उदय गावीत, निशा वळवी, लोटन पावरा, दिलीप पावरा, दीपाली पाटील, अनिल गावीत, प्रभात देसले, यशवंत वळवी आदी उपस्थित होते.