प्रधानमंत्री किसान सन्मानच्या ‘डाटा कलेक्शन’मध्ये नंदुरबार राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:50 AM2019-07-03T11:50:54+5:302019-07-03T11:51:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतक:यांची माहिती संकलीत करुन केंद्रशासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात नंदुरबार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतक:यांची माहिती संकलीत करुन केंद्रशासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात नंदुरबार जिल्ह्याने राज्यातून पहिला क्रमांक पटकावला़ नंदुरबारनंतर सातारा आणि नाशिक जिल्ह्याचा क्रमांक आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी जिल्ह्यातून 1 लाख 29 हजार 465 अपेक्षित पात्र लाभार्थी होते. त्यापैकी 66 हजार 269 लाभाथ्र्याची माहिती यापूर्वीच पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती़ उर्वरीत 63 हजार 196 लाभाथ्र्यांपैकी 50 हजार 837 लाभार्थीची माहिती एनआयसीच्या माध्यमातून अपलोड करण्यात आली आहे. माहिती संकलनाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्याकडून दर आठवड्याला तहसीलदारांकडून माहिती संकलीत करण्याबाबत आढावा घेण्यात येत आहे. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार आणि जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी धर्मेद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त कर्मचा:यांचे पथक माहिती तपासून अपलोड करत आहेत़ यासाठी तालुकास्तरावर माहिती संकलीत करण्यासाठी डेटा एन्ट्री ऑपरेटरची संख्या वाढविण्यात आली असून या कामाला विशेष प्राधान्य देण्यात येत आहे.
योजनेतील जमिन क्षेत्राची अट रद्द करण्यात आल्याने प्रशासनाने नव्याने शेतकरी कुटूंबांचे सव्रेक्षण पूर्ण करुन माहिती अपलोड करण्यास सुरुवात केली होती़ राज्यभरात नंदुरबार जिल्ह्याने अग्रणी स्थान मिळवल्याने प्रशासनातून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान माहिती तात्काळ अपलोड झाल्याने येत्या काळात शेतक:यांना मिळणारा लाभही तातडीने मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े यामुळे शेतक:यांना वार्षिक सहा हजार खात्यावर उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े