नंदुरबारात खाजगी आराम बसचे भाडे वाढूनही बुकींग मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:53 PM2018-04-29T12:53:50+5:302018-04-29T12:53:50+5:30
पुणे-मुंबईला मागणी : भाडेवाढ केल्यास कारवाईचे आदेश
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 29 : एसटी पेक्षा खाजगी आराम बसेसचे भाडे वाढूनही बुकींग मिळत नसल्याचे स्थिती आह़े गुजरातसह मुंबई आणि पुणे शहराकडे जाणा:या बसेसच्या भाडय़ात वाढ झाल्याने काहीअंशी नाराजी असली तरी एसटीपेक्षा आरामदायक प्रवासाला प्रवासी प्राधान्य देत आहेत़
सध्या लगAसराई आणि उन्हाळी सुटय़ा यामुळे नंदुरबार येथून बाहेरगावी जाणारे तसेच बाहेरगावाहून नंदुरबार येथे येणा:या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आह़े यात पुणे, मुंबई, सुरत, अहमदाबाद, भरूच, बडोदा, कल्याण, बदलापूर, ठाणे, बोरीवली यासह ठिकठिकाणी जाणा:या खाजगी आराम बसेसच्या भाडय़ात 200 ते 600 रूपयांची वाढ झाली आह़े यात प्रामुख्याने मुंबई आणि पुणे मार्गावरच्या सर्व स्लिपर कोच एसी-नॉनएसी बसेसचा समावेश असून त्यांच्या प्रवास भाडय़ात मोठी वाढ झाली आह़े यात मुंबई येथे जाणा:या बसेससाठी पूर्वी 500 ते 700 रूपये मोजावे लागत होत़े आजघडीस त्याच ठिकाणी 1 हजार 200 रूपयांची भाडेवाढ झाली आह़े हीच गत पुणे मार्गावर चालणा:या बसेसमध्येही आह़े एकीकडे ही भाडेवाढ झाली असताना प्रवासी या बसेसला प्रथम प्राधान्य देत आहेत़ बसमध्ये आराम करण्याच्या सुविधेसह एसी, मोबाईल चाजर्र आणि इतर सुविधा मिळत असल्याने या बसमधून प्रवास करणे पसंत केले जात आह़े रात्रीच्यावेळी नंदुरबार येथे जाणा:या एसटी बसेसही फुल्ल असून जागा मिळत नसल्याने काहीजण नाईलाजाने आरामबसच्या चालक केबीनमध्ये बसून इच्छित स्थळी पोहोचत आहेत़ यासाठी 600 रूपयांपेक्षा अधिक भाडे द्यावे लागत असल्याचे सांगण्यात आले आह़े
दरम्यान शासनाने शुक्रवारी आदेश काढून परस्पर भाडेवाढ करणा:या ट्रॅव्हल्सचालकाविरोधात कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत़ प्रादेशिक परिवहन विभागाचे पथक प्रवाशांच्या तक्रारीनुसार संबधितांवर कारवाई करणार आह़े