खाजगी वाहनांना मोकळ्या जागेची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 12:52 PM2020-01-23T12:52:45+5:302020-01-23T12:52:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या मोलगी ता.अक्कलकुवा येथे शहराच्या वाढत्या विस्तारामुळे दाटी होऊ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुर्गम भागातील प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या मोलगी ता.अक्कलकुवा येथे शहराच्या वाढत्या विस्तारामुळे दाटी होऊ लागली आहे. या दाटीमुळे परिसरातील खाजगी वाहनधारकांना वाहन लावण्यासाठी अपेक्षित जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे ही वाहने ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात लावली जात आहे. यासाठी तेथे मोकळी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.
धडगाव व मोलगी परिसरातील प्रमुख दोन बाजारपेठेपैकी एक असल्याने मोलगी शहराला महत्व प्राप्त झाले आहे. दिवसेंदिवस व्यावसायिकांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. शिवाय वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचा विस्तारही झपाट्याने होत आहे. या पाठोपाठ दुचाकी व चारचाकी वाहनांचा देखील वापर वाढला आहे. अशा या सर्व बाबींच्या तुलनेत मोलगी शहरातील जागेचा कुठलाही विस्तार झाला नाही. त्यामुळे तेथे कमालीची दाटी होऊ लागली आहे. मोलगीसह परिसरातील वाहनधारकांची संख्या वाढली असून कामानिमित्त मोलगीत येणाऱ्या वाहनधारक व खाजगी वाहतुक करणाºया वाहनेही वाढली आहे. खेडे व शहरातील ही सर्व वाहने शहरात एकत्र झाल्यास तेथे मोठी दाटी निर्माण होत आहे.
मोलगी येथील मुख्य रस्ता अरुंद असल्यामुळे हा रस्ता पादचाऱ्यांनाच अपुरा पडतो. तर वाहने लावण्यासाठी अपेक्षित जागाच उपलब्ध होत नाही. त्यामुळे बहुतांश खाजगी वाहनधाकांकडून मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात वाहने लावण्यात येत आहे. या वाहनांमुळे रुग्णालयातील आरोग्य सेवावर कुठलाही परिणाम तर झाला नाही, त्यात शंका नाही. परंतु परिणाम होणार नसल्याचेही सांगता येणार नाही. म्हणून अशी समस्या निर्माण होण्याआधीच या वाहनांसाठी मोलगीत वाहनधारकांच्या अपेक्षेनुसार मोकळी जागा उपलब्ध होणे आवश्यक असून नागरिकांकडून तशी मागणी होत आहे.
मोकळी जागा उपलब्ध झाल्यास शहराच्या मध्यवर्ती भागात लागणारी वाहनेही मोकळ्या जागेतच लावले जातील. कामानिमित्त मोलगीत येणाºया नागरिकांनाही मोकळा श्वास घेता येईल. एवढेच नव्हे तर तेथील नागरिक व व्यावसायिकांच्या दैनंदिन कामांवर कुठलाही परिणाम होणार नाही.
४अक्कलकुवा तालुक्याच्या एकुण क्षेत्रफळापैकी ८० टक्के क्षेत्र हे मोलगी तथा दुर्गम भागात येते. तशी लोकसंख्या देखील मोलगी भागातच अधिक आहे. अक्कलकुवा हे तालुका प्रशासकीय कामकाज व कार्यालयाचे ठिकाण आहे. त्यामुळे मोलगी भागातील बहुसंख्य नागरिकांना या कामांसाठी अक्कलकुवा गाठावे लागतले. शिवाय प्रशासकीय यंत्रणा लांब पडत असल्यामुळे मोलगी भागाचा अपेक्षेनुसार विकासही झाला नाही. नागरिकांची प्रशासकीय कामे वेळेवर व्हावी, विकास कामांवर जवळून नियंत्रण ठेवता यावे, यासाठी मोलगीला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी काही वर्षापासून करण्यात येत आहे.
४मोलगी हा नवीन तालुका निर्मितीसाठी नागरिकांनी केलेल्या मागणीची दखल घेत प्रशासनामार्फत प्रस्तावही मंजूर करण्यात आला. एवढेच नव्हे तर जानेवारी २०१५ मध्ये वनपट्टे वाटप व अन्य विकास कामांसाठी तत्कालीन राज्यपाल सी विद्यासागर राव हे पिंपळखुटा ता.अक्कलकुवा येथे आले होते. राव यांच्या दौऱ्यात मोलगी तालुक्याची अधिकृत घोषणा होईल, अशी अपेक्षा अवघ्या दुर्गम भागातील नागरिकांमार्फत करण्यात आली. परंतु प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण झाली नव्हती, त्यामुळे तालुक्याचा प्रश्न रखडला. राव यांच्या दौºयानंतर तालुका निर्मितीचा कुठलाही मुद्दा उपस्थित करण्यात आला नाही. त्यामुळे हा प्रश्न अद्याप अंधातरीच राहिला आहे.
या भागात शासनामार्फत अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. परंतु या सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी अपेक्षित यंत्रणा तेथे कार्यान्वित करण्यात आली नाही. शिवाय प्रशासकीय सेवेवर कुठलेही नियंत्रण ठेवण्यात येत नाही, त्यामुळे हा भाग नेहमीच उपेक्षित ठरत आला आहे. त्यात प्रामुख्याने दूरसंचार विभागाच्या सेवेवर बोट ठेवले जात आहे. यासह अन्य सविधा व योजनांची अंमलबजावणी वेळेवर व अपेक्षेनुसार होणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.