शहाद्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:56 AM2019-02-14T11:56:44+5:302019-02-14T11:56:50+5:30
सरपंच पदाचे दोन : १६ जणांची माघार
शहादा : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुक प्रक्रियेत अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत लोकनियुक्त सरपंचपदाच्या १० पैकी २ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले़ यातून तीन ग्रामपंचायतीसाठी आठ इच्छुक सरपंच पदाची निवडणूक लढवणार आहेत़
तालुक्यातील सुलानपूर, ब्राह्मणपुरी व ससदे या तीन ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे़ यात सदस्यपदासाठी ६४ जणांचे नामनिर्देशन दाखल झाले होते़ त्यापैकी बुधवारी १४ जणांनी माघार घेतली़ यामुळे २२ जागांसाठी ४३ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत़ तिन्ही ग्रामपंचायतींसाठी २४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे़ दरम्यान ससदे येथे ९ पैकी ७ जागा ह्या बिनविरोध झाल्या आहेत तर जागांसाठी चार उमेदवारांमध्ये लढत आहे़ सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदाकरिता ३ तर सदस्य पदासाठी ११ सदस्यपदाच्या जागांसाठी २१ जणांमध्ये निवडणूक रंगणार आहे़ ब्राह्मणपूरी ग्रामपंचायतीत दोघांंमध्ये सरपंच पदाकरिता सरळ लढत आहे़ सदस्यपदाच्या ९ जागांकरीता १८ उमेदवार इच्छुकांच्या सरळ लढती होणार आहेत़ उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले़ तहसीलदार मनोज खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रामजी राठोड, निवडणूक अधिकारी बी़ एम़सूर्यवंशी, समाधान पाटील, जुबेर पठाण, किशोर भांदुर्गे हे निवडणूक कामकाज पहात आहेत़ १७ फेब्रुवारी रोजी निवडणूक कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण शहादा तहसील कार्यालयात होणार आहे़
निवडणूक प्रचाराला बुधवारी सायंकाळपासूनच सुरुवात झाल्याने ब्राह्मणपुरी आणि सुलतानपूर येथील वातावरण ढवळून निघाले आहे़