वनविभाग करणार 33 लाख रोपांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:04 PM2018-04-01T13:04:13+5:302018-04-01T13:04:13+5:30

Production of 33 lakhs seedlings to forest department | वनविभाग करणार 33 लाख रोपांची निर्मिती

वनविभाग करणार 33 लाख रोपांची निर्मिती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : येत्या 1 जुलै रोजी 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाची जिल्ह्यात जय्यत तयारी सुरू आह़े तब्बल 45 लाख झाडांचे उद्दीष्टय़ असलेल्या जिल्ह्यात 33 लाख रोपांची निर्मिती एकटा वनविभाग करणार असून इतर विभागांकडून  12 लाख वृक्षांची निर्मिती होणार आह़े  
या कार्यक्रमासाठी नंदुरबार आणि तळोदा वनविभागाकडून रोपांची निर्मिती सुरू झाली असून वनविभागाच्या स्थायी आणि अस्थाई रोपवाटिकांमध्ये मजूर अहोरात्र परिश्रम घेत, झाडे तयार करत आहेत़ येत्या 90 दिवसात 30 लाखापेक्षा अधिक झाडे तयार करून त्यांना सुस्थितीत ठेवण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्नही सुरू झाले आहेत़ 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथील रोपवाटिकेत आतार्पयत तब्बल साडेपाच लाख रोपे तयार असून येत्या दोन महिन्यात आणखी पाच लाख रोपे तयार करण्याचे नियोजन आह़े 
23 प्रजातींची विविध झाडे तयार 
वनविभागाच्या ठाणेपाडा रोपवाटिकेत वृक्षलागवड कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आह़े यात 23 प्रजातींची झाडे तयार आहेत़ यात मोह (1 लाख 27 हजार 160), बांबू (1 लाख 11 हजार 246), कडूनिंब (71 हजार 758), चिंच (35 हजार 400), करंज (31 हजार 900), जांभूळ (18 हजार 480), आवळा (14 हजार 880), आंबा (10 हजार 376), बेल (13 हजार 160), पापडी (8 हजार ), देवकपास (6 हजार 400), गुलमोहोर (2 हजार 760), सादडा (3 हजार 480) अशी एकूण 4 लाख 57 हजार झाडे तयार झाली आहेत़ येत्या दोन महिन्यात मिश्र, बाहवा, खैर, बेहडा, साग, बोर, चिंच, शिसु, अशोक या झाडांची लागवड करण्यात येणार आह़े 
यातही वनविभागाकडे 2017 साली तयार करण्यात आलेली 79 हजार 974 झाडे तयार आहेत़ यात सिताफळ  (29 हजार 160), बाहवा  (9 हजार 300), खैर (6 हजार 200), बेहडा (6 हजार 160), शिसु  (3 हजार 200) आणि मिश्र प्रजातीतील 2500 झाडे तयार आहेत़ या झाडांमुळे वनविभागाकडे आजघडीस पाच लाख 36 हजार 974 झाडे तयार असून येत्या 1 जुलै रोजीच्या वृक्षारोपण कार्यक्रमात पूर्ण क्षमतेने वृक्षारोपण करण्यासाठी वनविभागाकडून जिल्ह्यातील इतर रोपवाटिकांमध्ये रोपे लावण्याच्या कामांना वेग देण्यात येत आह़े 
तळोदा आणि नंदुरबार वनविभागांतर्गत लावण्यात येणा:या झाडांची निर्मिती त्या-त्या विभागात करण्यात येत आह़े तळोदा येथील मुख्य रोपवाटिकेत पावणेतीन लाख रोपांची निर्मिती होणार आह़े त्यासोबत नंदुरबार वनविभागांतर्गत ठाणेपाडा, घोघळगाव ता़ नंदुरबार, चिंचपाडा, करंजी खुर्द ता़ नवापूर येथे दोन महिन्यात 20 लाख झाडे तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आह़े ठाणेपाडा येथील अस्थाई रोपवाटिकेत वनमजूर दर दिवशी किमान 10 हजार रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करत आहेत़ खत आणि पाणी देऊन तयार होणा:या या झाडांचे वाटप प्रशासकीय कार्यालय, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये, सेवाभावी संस्था, धार्मिक मंडळे यांना करण्यात येणार आह़े
4वृक्षलागवडीबाबत नागरिकांमध्येही रूची वाढली असल्याने  मागणीनुसार झाडांचा पुरवठा करण्याची तयारी वनविभाग करत आह़े जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयांकडून प्रामुख्याने गुलमोहोर अमलतास, शेतक:यांकडून बांबू, महू आणि साग तसेच रहिवासी वसाहतींमध्ये कडूनिंबासह इतर वृक्ष लागवडीसाठी देण्यात येणार आह़े वनविभाग मागणी तसा पुरवठा करण्यावर भर देणार आह़े 

Web Title: Production of 33 lakhs seedlings to forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.