नंदुरबारातील मराठा सेवा संघातर्फे छिंदम यांच्या वक्तव्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:30 PM2018-02-18T12:30:40+5:302018-02-18T12:30:57+5:30

निवेदन : देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Prohibition of Chhatham's statement by the Maratha Seva Sangh of Nandurbar | नंदुरबारातील मराठा सेवा संघातर्फे छिंदम यांच्या वक्तव्याचा निषेध

नंदुरबारातील मराठा सेवा संघातर्फे छिंदम यांच्या वक्तव्याचा निषेध

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 18 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणा:यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व अशा विकृतींना वेळीच रोखावे अशी मागणी मराठा सेवा संघातर्फे करण्यात  आली. 
जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात मराठा सेवा संघातर्फे म्हटले आहे की, नगरच्या उपमहापौरांनी अतिशय घाणेरडय़ा शब्दात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गरळ ओकली. समाजात अशा प्रवृत्ती फोफावत असल्यामुळे त्यांना वेळीच ठेचून काढणे आवश्यक ठरते. एखाद्या थोर पुरुषाला, जातीला किंवा धर्माला उद्देशून जेंव्हा एखादी व्यक्ती बोलते ती बाब सहज घेण्यासारखी नक्कीच नाही. श्रीपाद धिंदम याच्या वक्तव्याचा नंदुरबार जिल्हा मराठा सेवा संघ तीव्र निषेध व्यक्त करीत आहे. धिंदम यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शिक्षा करावी जेणेकरून यापुढे शिवाजी महाराजांबद्दल असे वक्तव्य करण्याचे धाडस कुणी करणार नाही अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक संजय पाटील यांना देखील निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, सचिव राजेंद्र पाटील, पालिका सभापती कैलास पाटील, कुंदन पाटील, जितेंद्र पाटील, नरेंद्र पाटील, अशोक पाटील, यांच्यासह मराठा सेवा संघ आणि मराठा समाज बांधव उपस्थित होते.
 

Web Title: Prohibition of Chhatham's statement by the Maratha Seva Sangh of Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.