लांबच्या बसफे-या होताय रद्द : अक्कलकुवा आगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:36 PM2018-05-26T12:36:24+5:302018-05-26T12:36:24+5:30
चालक-वाहकांच्या रिक्त जागांमुळे समस्या, समस्यांचे पाढे
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 26 : अक्कलकुवा आगारात वाहक, चालकांच्या कमतरतेमुळे अनेक लांब पल्ल्यांच्या बसफे:या रद्द करण्याची वेळ आली आह़े चालक-वाहकच उपलब्ध नसल्यामुळे सकाळी सात वाजता अक्कलकुवा आगारातून तळोद्याला येणारी बस तसेच अक्कलकुवा-जळगाव बस 14 ते 16 मे असे सतत 3 दिवस सोडण्यात आल्या नव्हत्या़ तसेच अशाच अनेक बसेस् अद्यापही अनियमित स्वरुपात सोडण्यात येत आहेत़
अक्कलकुवा-ब:हाणपूर या बसचीही अशीच गत आह़े अनेकदा ही बस चालक-वाहकांअभावी सोडण्यात येत नसल्याची वस्तूंस्थिती प्रवाशांकडून सांगण्यात येत आह़े अनेक वेळा तर पूर्व सूचनेशिवाय कधीही ही बस रद्द करण्यात येत असत़े अक्कलकुवा-वाशिम ही लांब पल्ल्याची बसही याच कारणामुळे अनेक वेळा रद्द करावी लागत होती़ त्यामुळे आता ही बस बंदच करण्यात आली असल्याची माहिती आगारप्रशासनाकडून देण्यात आली़ अनेक वेळा बसफे:या सुरु होतात आणि नंतर मध्यच बंद करण्यात येत असतात़ त्यामुळे प्रवाशांच्या मनात संभ्रम निर्माण होत असतो़ त्याच प्रमाणे त्यांची गैरसोयसुध्दा यातून होताना दिसत़े परंतु याबाबींकडे ना आगार प्रशासन बोलायला तयार ना एसटी महामंडळाचा धुळे विभाग़ अक्कलकुवा-औरंगाबाद ही बस वाहक-चालक नसल्याने अनेकदा चाळीसगावर्पयत जाते व तेथून परत येत़े याबाबत अक्कलकुवा आगारात पुरेसे वाहक-चालक नसल्याने अनेक बसफे:या या आगाराच्या सोयीनुसारच चालविण्यात येत असल्याचे वास्तव समोर आले आह़े
दरम्यान सध्या उन्हाळी सुटय़ा, लगAसराईचे दिवस आहेत़ त्यामुळे प्रवासाचा ‘सिझन’ आह़े या सुटीच्या हंगामात उलट जादा बसेस वाढवून फे:यांची संख्याही वाढवणे अपेक्षीत असत़े यातून नेहमी तोटय़ात जाणा:या राज्या परिवहन महामंडळाच्या उत्पन्नातही भर पडू शकत़े परंतु अक्कलकुवा आगराच्या संदर्भात नेमका उलटाच प्रकार बघायला मिळत आह़े
दरम्यान, आगारप्रमुख अनुजा दुसाने यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगारात सध्या क्षमतेपेक्षा निम्मेच वाहक-चालक आहेत़ अनेक पदे रिक्त आहेत़ कर्मचा:यांची संख्या वाढवून रिक्त पदे भरणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितल़े या शिवाय प्रवाशांना योग्य सुविधा देणे शक्य नसल्याचीही कबुली त्यांनी दिली़ अक्कलकुवा आगराकडून याबाबत वरिष्ठ पातळीवर वारंवार पत्रव्यवहार करुन लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे दुसाणे यांनी सांगितल़े अनेक कर्मचारी आजारपणामुळे रजेवर जातात़ अनेक कर्मचारी लांबवरुन आलेले आहेत़ तेव्हा अनेक कारणास्तव कर्मचा:यांना रजा दिल्यास ते लवकर रुजू होत नाहीत़ लांब पल्ल्यांच्या बसफे:या केल्यानंतर त्याच कर्मचा:यांना पुन्हा दुस:या बसफेरीसाठी पाठवावे लागत़े कर्मचा:यांना जादा कामाचा फत्ता देण्यात येतो़ परंतु शेवटी तेही थकत असल्याने एक व्यक्ती किती काम करणार असा प्रश्न निर्माण होत असतो़ लांबच्या बसफे:यांवरुन रात्री उशिरा परतल्यानंतर त्यांनाही विश्रांतीची आवश्यकता असत़े ह्या बाबीही लक्षात घेणे गरजेचे असत़े
अनेक वाहक-चालक बदली होऊन त्यांच्या जागी नवीन येणारे कर्मचारी लवकर कामावर रुजू होत नसतात़ तसेच अनेक कर्मचारी वैयक्तिक कारणांसाठीही गैरहजर राहत असतात़ अशा वेळी इतर कर्मचा:यांना कामाचा मोठय़ा प्रमाणात ताण सहन करावा लागत असतो़ इतक्या समस्या असून आहे त्या कर्मचारी संख्येवर प्रवाशांना वाहतूक सुविधा पुरवाव्या लागत असल्याचे या वेळी आगाराकडून सांगण्यात आल़े दरम्यान असे असले तरी, एसटी महामंडळाने रिक्त जागा त्वरित भरुन सुविधा वाढवाव्या अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशांकडून करण्यात आली आह़े