मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा नंदुरबारातील नाभिक समाजातर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:19 PM2017-11-19T12:19:37+5:302017-11-19T12:19:57+5:30
जिल्ह्यात आंदोलन : तालुकास्तरावर तहसीलदारांना निवेदन
Next
ल कमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाज बांधवांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा निषेध व्यक्त करत जिल्ह्यात निवेदन देण्यात आल़े जिवा-शिवा सेना, नाभिक समाज संघटना, हितवर्धक समाज यासह विविध संघटनांनी त्यांचा निषेध नोंदवला़नंदुरबार येथे नाभिक समाजातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांना निवेदन देण्यात आले. शनिवारी सर्व समाज बांधवांनी दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. नवापूरराज्याचे मुख्यमंत्री यांनी नाभिक समाजाबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा येथील श्री संत सेना महाराज नाभिक हितवर्धक संस्थेने निषेध व्यक्त करीत शनिवारी शहरातील सर्व नाभिक समाज बांधवांनी दुकाने बंद ठेवून तहसीलदार प्रमोद वसावे यांना निवेदन दिल़े मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी विरोधकांना टोला मारताना नाभिक समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखविल्या असे नमूद करून या वक्तव्याचा निषेध नोंदवून मुख्यमंत्री यांनी जाहीर माफी मागावी या साठी आज संपूर्ण महाराष्ट्रात नाभिक समाजाने आपली व्यावसायिक दुकाने बंद ठेवून निवेदन देण्यात आल़े यात नवापूर नाभिक समाजाने सहभाग घेत आपली दुकाने बंद ठेवलीत. निवेदन देतांना श्री संत सेना महाराज नाभिक हितवर्धक संस्था, दुकानदार संघ व नाभिक युवक संघ यांचे पदाधिकारींसह सर्व नाभिक समाज बांधव उपस्थित होते.शहादाशहादा तालुका नाभिक समाजातर्फे शहरात मूकमोर्चा काढण्यात आला़ या वेळी नाभिक समाजबांधवांनी काळ्या फिती लावत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध केला़ संत सेना चौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली़ तूप बाजार, मेन रोड, सोनार गल्ली, शाही-मशीद, काझी चौक, खेतिया चार रस्ता चौक, महात्मा गांधी पुतळा या मार्गाने तहसील कार्यालयात आलेल्या मोर्चेक:यांनी तहसीलदार यांना निवेदन दिल़े या वेळी नाभिक समाजाचे अध्यक्ष उद्धव जांभळे, प्रभाकर चित्ते, प्रदीप सोनवणे, लक्ष्मण शिरसाठ, प्रा़ अनिल साळुंके, हेमराज पवार, कृष्णा चित्ते, अनिल ठाकरे, अजय मोरे, अविनाश न्हावी, संतोष सोनगरे, खुशाल न्हावी, राहुल सोळंकी, नीलेश जांभळे, अजरुन सोनवणे, योगेश सोळंकी, हेमंत सोनगिरे, काशिनाथ चित्ते, बन्सी महाले, प्रवीण मोरे, दिलीप कन्हैया, अजय मोरे, देवेंद्र बागुल, सुरेश सैंदाणे, गिरधर न्हावी, सोमनाथ पवार, जयराज बोरसे, दीपक सोनवणे, ज़ेपी़राऊत, तुंबा न्हावी, नीलेश कन्हैया, लक्ष्मण बोरदेकर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होत़े तळोदानाभिक समाज, अखिल भारतीय जिवा सेना संघटना, गुजर्र नाभिक समाज यांच्यासह समाजातील विविध संघटना, संस्था आणि मंडळे यांच्या वतीने तळोदा तहसीलदारांना निवेदन देण्यात आल़े या निवेदनात देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध असून त्यांनी संपूर्ण नाभिक समाजाची माफी मागावी, अन्यथा रास्ता रोको व पुतळा दहन असे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला़