तळोदा तालुक्यातील प्रकल्प कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 01:16 PM2018-07-29T13:16:14+5:302018-07-29T13:16:22+5:30

सरासरी पावसाचाअभाव : भूमिगत जलपातळीत होते झपाटय़ाने घट

Projects in Taloda taluka | तळोदा तालुक्यातील प्रकल्प कोरडे

तळोदा तालुक्यातील प्रकल्प कोरडे

Next
<p>तळोदा : यंदाचा पावसाळा सुरू होवून जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे, असे असतांना तालुक्यातील लघुसिंचन प्रकल्पांचा जलसाठय़ात वाढ झालेली नाही. सिंगसपूर वगळता इतर पाच प्रकल्पांमध्ये आतापावेतो केवळ पाच टक्के जलसाठा असल्याचे सांगण्यात आले आहे. जलसाठय़ाबाबत गढवली व धनपूर हे तर निरंक आहेत. दरम्यान जुलै अखेर पावेतो तालुक्यात 310 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील धरणांच्या जलसाठय़ात वाढ होण्यासाठी सलग दमदार पावसाची प्रतिक्षा लागून आहे.
हवामान विभागाने यंदा संपूर्ण देशात सरासरी पेक्षा अधिक प्रमाणात पजर्न्यमान राहण्याचा अंदाज पावसापूर्वी व्यक्त केला होता. या खात्याचा अंदाज नंदुरबार जिल्हा वगळता राज्यात इतर सर्वच ठिकाणी खरादेखील ठरला आहे. कारण याठिकाणी मोठय़ा प्रमाणात अतिवृष्टी झाल्याचे चित्र ही दिसून आले आहे. परंतु हवामान खात्याचा अंदाज सद्यातरी फोलच ठरला आहे. कारण पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटण्यात आला आहे. तरीही दमदार पाऊस झालेला नाही. 
जोरदार पावसाअभावी तळोदा तालुक्यातील नदी-नाले अजूनही कोरडे ठाक आहेत. एवढेच नव्हे तर लघुसिंचन प्रकल्पांच्या जलसाठय़ात ही अत्यंत अल्प जलसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे. धुळे येथील लघुसिंचन प्रकल्पाच्या आकडेवारीनुसार सिंगसपूर लघुसिंचन प्रकल्पात थोडय़ा प्रमाणात जलसाठय़ात वाढ झाली आहे. या प्रकल्पात 1.22 दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा उपलब्ध झाला  आहे. त्या खालोखाल पाढळपूर प्रकल्पात जलसाठा झाला आहे.           येथे 0.44 दशलक्ष घनमीटर           आहे.
रोझवा व महुपाडा या प्रकल्पांमध्ये अत्यंत अल्प प्रमाणात जलसाठा असल्याची स्थिती आहे. गढवली व धनपूर हे दोन्ही प्रकल्प तर जलसाठय़ाबाबत निरंकच असल्याची माहिती देण्यात आली आहे. वास्तविक आतापावेतो निम्मे पावसाळा उलटला आहे. तरीदेखील तालुक्यात अजून पावेतो समाधानकारक पाऊस झालेला नाही. आजही तालुक्यातील ही सिंचन प्रकल्पे भरण्यासाठी सलग जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. तुरळीक पावसामुळे सध्या सर्वत्र पिकांची स्थिती उत्तम असली तरी नदी नाले अन् कोरडी धरणांमुळे शेतक:यांना आतापासूनच भूगर्भातील जलपातळीची चिंता सतावत असल्याची व्यथा शेतक:यांनी बोलून दाखविली. गेल्या वर्षी कमी पजर्न्यमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी प्रचंड खालावली गेली होती. या वेळी शेतक:यांचे कृषी पंपही मोठय़ा प्रमाणात निकामी झाले होते. साहजिकच यंदातरी तशी परिस्थिती उद्भवू नये अशी शेतक:यांची वरून राजाला प्रार्थना अहे. गेल्या वर्षी जुलै अखेर्पयत तळोदा तालुक्यात साधारण साडे चारशे मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला होता.
 

Web Title: Projects in Taloda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.