तळोदा तालुक्यात ऊसावर ‘होमनी’चा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:08 PM2018-10-25T12:08:02+5:302018-10-25T12:08:07+5:30

बोरद : तळोदा तालुक्यातील ऊसावर होमनी नावाच्या रोगाचे आक्रमण झाले असल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत़ रोगावर नियंत्रण न ...

Prolapse of 'Homini' on sugarcane in Taloda taluka | तळोदा तालुक्यात ऊसावर ‘होमनी’चा प्रादुर्भाव

तळोदा तालुक्यात ऊसावर ‘होमनी’चा प्रादुर्भाव

Next

बोरद : तळोदा तालुक्यातील ऊसावर होमनी नावाच्या रोगाचे आक्रमण झाले असल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत़ रोगावर नियंत्रण न मिळवल्यास ऊस उत्पादनासोबत येत्या तीन वर्षाची नापिकी येण्याची शक्यता असल्याने चिंता वाढल्या आहेत़
तळोदा तालुक्यात यंदा पाऊस नसल्याने ऊस उत्पादनावर मोठा परिणाम जाणवत आह़े पावसाअभावी पिकाची योग्य ती वाढ झालेली नसल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े यातच आता ऊसावर होमनी या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून आले आह़े रोगामुळे शेतातील उभा ऊस जमिनीवर कोसळत असल्याने शेतक:यांचे नुकसान होत आह़े तालुक्यात यंदा सहा हजार हेक्टर ऊसाची लागवड करण्यात आली आह़े बहुतांश ठिकाणी ऊस तोडीवर आला आह़े शेतक:यांकडून नोंदणी झालेला हा ऊस मुळापासून जीर्ण होऊन जमिनदोस्त होऊ लागल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी कृषी विभागाकडे संपर्क केला होता़ परंतू त्यांच्याकडून योग्य ती माहिती मिळालेली नाही़ दरम्यान सातपुडा साखर कारखान्याचे कृषी अधिकारी गोपाळ पाटील यांनी शेतक:यांकडून माहिती घेत पाहणी केली होती़ यात होमनी रोग आल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी उपायायोजना करण्याचा सल्ला शेतक:यांना दिला आह़े होमनीचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असताना बेणी नावाचा रोगही ऊसावर दिसून आल्याचे शेतक:याचे म्हणणे आह़े या रोगांवर उपाययोजना करण्याबाबत शेतक:यांना सातपुडा साखर कारखान्याकडून मार्गदर्शन करण्यात येत आह़े कृषी विभागानेही याकडे गांभिर्याने लक्ष देऊन मार्गदर्शन करण्याची अपेक्षा आह़े 
 

Web Title: Prolapse of 'Homini' on sugarcane in Taloda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.