आरोग्य कर्मचाऱ्यांना लवकरच पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 12:03 PM2020-12-01T12:03:24+5:302020-12-01T12:03:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आरोग्य सेवक यांना आरोग्य सहाय्यक पदी व आरोग्य सेविका यांना आरोग्य साहाय्यिका यापदी सर्व ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आरोग्य सेवक यांना आरोग्य सहाय्यक पदी व आरोग्य सेविका यांना आरोग्य साहाय्यिका यापदी सर्व रिक्त जागांवर पदोन्नती देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी सर्व पात्र कर्मचाऱ्यांना वैयक्तिक पत्र पाठवून आवश्यक त्या कागद पत्रांची पूर्तता करण्याचे सांगितले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके यांनी सांगितले.
आरोग्य कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष हर्षल मराठे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनाच्या वेळी डॅा. बोडके यांनी ही माहिती दिली. ४ रोजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या नेतृत्वाखाली व महासंघाचे नेते डॉ. कांतिलाल टाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद आस्थापनेवरील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना निवेदन देऊन झालेल्या चर्चेत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चारही मागण्या मंजूर करण्यात आल्या होत्या. व त्यांची पूर्तता दिवाळीनंतर करू असे सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर महासंघाने चर्चा केली. चर्चेत महासंघाचे अध्यक्ष हर्षल मराठे, चिटणीस सतीश जाधव, नितीन पवार, विशाल मोघे, नितीन वाडीले आदी उपस्थित होते.
ज्यांच्या सेवाकाळ १०,२० व ३० वर्ष पूर्ण झालेला आहे.
अश्याना कालबद्ध पदोन्नतीचे फायदे देण्यासाठी सर्व पात्र कर्मचाऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कार्यालयाकडून पत्र पाठविण्यात येणार आहे. सदरची कार्यवाही १० डिसेंबर पर्यंत करण्यात येणार आहे.
प्रशासनाकडून दिलेल्या शब्दाप्रमाणे अनुषंगिक कार्यवाही अंगीकारण्यात येऊन कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष लाभ पदरात पडेल असा विश्वास आरोग्य कर्मचारी महासंघाचे नेते डॉ कांतीलाल टाटीया यांनी व्यक्त केला.