प्रचार तोफा थंडावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 11:34 AM2019-10-20T11:34:39+5:302019-10-20T11:35:19+5:30
नंदुरबार : गेल्या 14 दिवसांपासून सुरू असलेली जाहीर प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी पाच वाजता थंडावली. आता रविवारी मतदान साहित्य ...
नंदुरबार : गेल्या 14 दिवसांपासून सुरू असलेली जाहीर प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी पाच वाजता थंडावली. आता रविवारी मतदान साहित्य वाटप करून सोमवारच्या मतदानाची तयारीसाठी प्रशासन सज्ज होत आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांनी देखील जास्तीत जास्त मतदार मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी नियोजन करीत आहे. जिल्ह्यातील चारही मतदारसंघात गेल्या 13 ते 14 दिवसांपासून जाहीर प्रचारात सर्वच उमेदवारांनी आपले कौशल्य पणाला लावले होते. भाजप, शिवसेना या पक्षांनी आपल्या राष्ट्रीय व राज्य नेत्यांना प्रचारासाठी पाचारण केले होते. तर काँग्रेस व इतर पक्षांनी स्थानिक स्तरावरच प्रचाराला प्राधान्य दिले होते. गेल्या दोन दिवसात प्रचार रॅली, जाहीर सभा यांची रेलचेल होती. शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रय} केला. शेवटच्या क्षणार्पयत अर्थात पाच वाजेर्पयत प्रचार सुरू होता.
या मुद्यांवर केला प्रचार
1 आदिवासींच्या आरक्षणासंदर्भात भाजप व काँग्रेसने एकमेकांवर आरोप केले. प्रत्येक सभेत याबाबत दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप झाले. राष्ट्रीय व राज्य नेत्यांनी देखील हा प्रश्न लावून धरला.
2 जिल्ह्याच्या विकासाचा मुद्दा देखील प्रचार काळात समोर आला. सत्ताधारी व विरोधक यांनी कुणी विकास केला यावरच दावे-प्रतिदावे केले. दोन्ही गटाने आपणच विकास केला यावर ठामपणे दावा करण्याचा प्रय} केला गेला.
3 सिंचनाचा प्रश्न देखील गाजला. जिल्ह्यातील बॅरेज्स कुणी मंजुर केल. कुणाच्या काळात बांधले गेले, कुणी पाणी आडवले यावर चर्चा झडल्या.
4 नंदुरबारचा औद्योगिक विकास झाला नाही. कुणामुळे जिल्हा मागास राहिला. औद्योगिकरण का रखडले याबाबतत प्रत्येकांच्या सभांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. नंदुरबार, नवापूर व शहाद्याच्या एमआयडीसीबाबत ते दिसले.
या घटनांनी वेधले लक्ष
शहादा : भाजपने विद्यमान आमदारांचे तिकिट कापून त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली. या नाटय़मय घटनेचे पडसाद उमेदवारी दाखल करण्यार्पयत कायम राहिले.
नंदुरबार : काँग्रेस पक्षाने या मतदारसंघात आधी जाहीर केलेला उमेदवार ऐनवेळी बदलला. भाजपचे आमदार उदेसिंग पाडवी यांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसची उमेदवारी मिळविली.
अक्कलकुवा : मतदारसंघात युतीअंतर्गत शिवसेनेचा उमेदवार असतांना भाजप पदाधिका:याने या ठिकाणी बंडखोरी केली. त्यामुळे येथे तिरंगी लढत रंगली.
यांच्या झाल्या सभा
शहादा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली.
धडगाव : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली.
नवापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांची सभा झाली
तळोदा : भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांची सभा झाली.
सर्वाधिक सभा भाजपच्या
जिल्ह्यातील चार पैकी तीन मतदारसंघात भाजपचे उमेदवार असल्याने भाजपने तीन सभा घेतल्या. मात्र, नंदुरबार मतदारसंघात कुणीही मोठय़ा नेत्याची सभा झाली नाही.
शिवसेनेतर्फे एका मतदारसंघात उमेदवार आहे. तेथे पक्ष प्रमुखांची सभा घेण्यात आली.
काँग्रेसचे चारही जागांवर उमेदवार असतांना या ठिकाणी कुणाही मोठय़ा नेत्याची सभा झाली नाही. स्थानिक स्तरावर उमेदवारांनीच प्रचार सभा घेतल्या.
सैनिक मतदार..
4जिल्ह्यात 401 सैनिक मतदार आहेत. त्यात अक्कलकुवा मतदारसंघात 43, शहादा मतदारसंघात 146, नंदुरबार मतदारसंघात 157 तर नवापूर मतदारसंघात 55 सैनिक मतदारांचा समावेश आहे.
असा राहिल
पोलीस बंदोबस्त
निवडणूकीसाठी जिल्ह्यात एक पोलीस अधिक्षक, एक अपर अधीक्षक, चार उपअधीक्षक, पंधरा, पोलीस निरिक्षक, 47 सहायक पोलीस निरिक्षक, 1 हजार 94 पोलीस कर्मचारी, 855 होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आह़े
अशा रंगल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी
देवेंद्र फडणवीस
शहादा : विरोधकांनी आपल्या सत्तेच्या काळात केवळ लोकांना भुलवत ठेवल्ंो. विविध कल्याणकारी योजनांची वाट लावली. पाच वर्षाच्या भाजप सरकारने लोकांर्पयत योजना पोहचविल्या. त्यामुळे ख:या अर्थाने विकासाला चालना मिळाली.
अमित शहा
नवापूर : आदिवासींच्या उत्थानाचे काम हे भाजप सरकारने केले आहे. आदिवासी, दलित, ओबीसी यांचा केवळ मतांसाठी वापर यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने केला आहे. येत्या काळात जास्तीत जास्त योजना तळागाळार्पयत पोहचविण्याचा प्रय} आहे.
उद्धव ठाकरे
धडगाव : आदिवासींच्या आरक्षणला कुणीही हात लावू शकत नाही. त्यांचा हक्क, त्यांचे कायदे हे अबाधीत राहणार आहे. शिवसेनेने नेहमीच तळागाळातील लोकांच्या हिताचे संरक्षण केले आहे. त्यांच्या हक्कासाठी नेहमीच लढा दिला आहे.
अॅड.के.सी.पाडवी
अक्कलकुवा : आदिवासींच्या योजना कमी करणे, आरक्षण हटविणे असे प्रकार भाजप सरकार करू पहात आहे. टीबीटीच्या माध्यमातून सरकारने विद्याथ्र्याना जेरीस आणले आहे. शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नसल्याचे प्रकार सुरू आहेत.
चार मतदारसंघातील स्थिती
जिल्ह्यात एकूण चार मतदार संघ आहेत़ यात अक्कलकुवा मतदारसंघात सहा उमेदवार रिंगणात असून 349 मतदान केंद्रे आहेत़ शहादा मतदार संघात चार उमेदवार रिंगणात तर 339 मतदारसंघ आहेत़ नंदुरबार मतदारसंघात सहा उमेदवारांचे भवितव्य 361 मतदान केंद्रात बंद होईल़ नवापुर मतदार संघात 10 उमेवारांसाठी मतदार 336 मतदान केंद्रात मतदान करतील़